Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: 'आरक्षण नाही तर सत्ता येऊ देणार नाही', मनोज जरांगे कडाडले; सत्ताधारी- विरोधकांवर गंभीर आरोप

Manoj Jarange Patil Maratha Aarkshan Latest News: "७० वर्षापासून सगळे वेड्यात काढत आहेत. लोकांच्या मनात अती खदखद आहे," असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन इशारा दिला आहे.

Gangappa Pujari

रामनाथ ढाकणे| छत्रपती संभाजीनगर, ता. २७ जुलै २०२४

मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधारी हे उल्लू बनवत आहेत, असा घणाघात करत आरक्षण मिळवून दिले तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही, असा थेट इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून आरक्षण द्यायला हवे. आरक्षण द्यायला काहीच लागत नाही. मनात असेल तर काही करता येते मनात असेल तर देता येते. ७० वर्षापासून सगळे वेड्यात काढत आहेत. लोकांच्या मनात अती खदखद आहे. लोकांना समजते की आपल्याला कोण उल्लू बनवते. विरोधक आणि सत्ताधारी हे उल्लू बनवतात," अशी थेट टीका जरांगे पाटील यांनी केली.

शरद पवारांना उत्तर

यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या आक्षेपावरुन महत्वाचे विधान केले. "राजकीय नेत्यांना आणि समाजाला आमच्यात आणि सरकारमधील चर्चेची माहिती हवी असेल तर सर्व लाईव्ह आहे. सत्ताधारी आणि विरोधक गैरसमज पसरवणार आहेत. माझ्या समजाने का नेत्यांच्या हमाल्या करायच्या का? विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांचे हे समाजासाठी नाटक आहे," असेही जरांगे पाटील म्हणाले.

दरम्यान, "न्याय मिळून द्यायचा असेल तर एकत्रित यावे. आमचा जीव आरक्षणात आहे मात्र सरकारचा जीव खुर्चीत आहे, असं म्हणत आरक्षण मिळून दिले नाही तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल," असा थेट इशाराही जरांंगेंनी सरकार तसेच विरोधकांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT