Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: 'सरकारकडून टोलवाटोलवी झाली तर उद्या...' शिष्टमंडळाच्या भेटीआधी जरांगे पाटलांचा मोठा इशारा

Manoj jarange Patil Maratha Aarkshan Latest News: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे. या भेटीआधीच जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.

डॉ. माधव सावरगावे

जालना, ता. १३ जून २०२४

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. आज मंत्री शंभुराज देसाई यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे. जरांगेंनी उपोषण सोडावे, याबाबतची चर्चा आजच्या भेटीत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच या भेटीआधीच जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"राज्य सरकारकडून भेटीसाठी कोण येणार आहे, मला माहित नाही. काल येणार होते पण आले नाहीत. ते आल्यानंतरच चर्चा होईल. सरकारला मी वारंवार सांगितलं आहे. भेटायला येणार की चर्चेसाठी येणार ही किचकट गोष्ट आहे. मी सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे. पण आरक्षणाचा विषय तडीस नेणार आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे," असे जरांगे पाटील म्हणाले.

तसेच "मला भेटायला येणारे नेते मराठा म्हणून भेटायला येतायत. मी फक्त त्यांना समाजाचे प्रश्न सांगतो. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत. आता आम्हाला आमच्या मागण्यांवर फक्त कारवाई हवी, असे म्हणत 12-12 महिने अंमलबजावणीला लागतात का?" असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

"मी सकारात्मक आहे. जर निर्णय झाला नाही तर उद्या पाच वाजता मी माझा निर्णय घेईल. सरकारकडून अशीच टोलवा- टोलवी झाली तर उद्या पाच वाजता मी माझी दिशा ठरवणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान, आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील भोसरीत टेम्पोचा अपघात; दुचाकीस्वारावर जखमी

Chandrapur Voter: एकाच घरातील ११९ मतदारांपैकी एक महिला अखेर सापडली; नव्या दाव्यानं नवा ट्विस्ट

Meat Ban Row : १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी; विरोधकांकडून चिकन बिर्याणी आणि मटण कुर्मा पार्टी, कधी अन् कुठे?

Sanjay Raut: गद्दारांचं रक्त सैनिकांच्या शरीरात जाता कामा नये; संजय राऊतांचे सैन्य अधिकाऱ्यांना पत्र|VIDEO

OBC Reservation: मोदी सरकार OBC आरक्षणात बदल करणार, काय आहे कारण? कोणाला होणार फायदा?

SCROLL FOR NEXT