अक्षय शिंदे, जालना
Manoj Jarange Patil News: विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर एकीकडे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे मनोज जरांगही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. सरकारने आचार संहिते अगोदर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे वारंवार करत होते. मात्र मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होण्याआधीच काल राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
"ज्यांनी अर्ज केलेत त्यांच्याशी उद्या बोलणार आहे. त्यांच्याशी मला प्रथम चर्चा करायची आहे. 20 ऑक्टोंबरला समाजाची बैठक होणार आहे, लढायचं की पाडायचं ठरवणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी बैठकीला यावे, आपल्या हातात दिवस कमी आहे, सावध राहा , उमेदवार द्यायचे नाही हे ठरवलं जाईल, पण कागदपत्रे तयार राहू द्या. विधानसभा निवडणुकीत काय करायचं समाजाला विचारून निर्णय घेणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"समाजाला आता शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, ज्यांना शक्य त्यांनी यावं, काम बुडवून येऊ नका. फुकट केस करून फायदा केला, केसेस झाल्या आम्हाला नोकरीत जाता येईना. आमच्या डोक्यात गोळ्या लागल्या हा फायदा आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीकडून लिहून आणा म्हणाले. 15 जाती ओबीस त घेतले हा फायदा आहे का आमचा? असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
"मराठ्यांचे आंदोलनापुढे ओबीसीची आंदोलन बसवले फडणवीस यांनी हा फायदा आहे का? शिंदे समिती काम करत नाही हा आमचा फायदा आहे का? फडणवीस यांनी आमचे प्रमाणपत्र रोखले हा फायदा आहे का?" असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, २० ऑक्टोबरला होणाऱ्या या बैठकीत हजर राहण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. या बैठकीत काय निर्णय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.