Manoj Jarange Patil Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना 'ओबीसीं'कडून नाही तर कोणाकडून धोका?; ओबीसी नेत्यांच्या विधानाने खळबळ

Maratha Reservation/OBC Reservation : मनोज जरांगेंच्या गावात आंतरवाली सराटीत ड्रोन गिरट्या घालत घसल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यावर आज ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगें यांच्यावरच संशय व्यक्त केला आहे.

Sandeep Gawade

अक्षय शिंदे, साम टीव्ही प्रतिनिधी

ड्रोन कॅमेराचा खोडसाळपणा जरांगेच्याच लोकांनी केला असेल, ड्रोनवरून दिशाभूल करून काहीतरी पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम असू शकतो, असा गंभीर आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. जरांगेंना भीती वाटत असेल तर त्यांनी संरक्षण घेतलं पाहिजे, आमचा त्याला विरोध नाही, असंही वाघमारे यांनी म्हटलंय.

यावेळी नवनाथ वाघमारे यांनी शरद पवार यांनी आरक्षणाबाबत त्यांची नक्की भूमिका काय आहे? ती जाहीर करावी. त्यांचे नेते राजेश टोपे सभागृहात सगे सोयरेची अंमलबजावणी करण्याची मागणी करत असल्याने ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मराठा नेते जरांगे पाटील यांच्या जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मागच्या काही दिवसांपासून ड्रोन घिरट्या घालत असल्याचं समोर आलं आहे. ग्रामस्थांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावर मनोज जरांगें पाटील संतापले आहेत. अंतरवाली सराटीत ड्रोन घिरट्या घातल आहेत. तुमच्या जिवाला धोका आहे असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्यावर मनोज जरांगे यांनी, मला मारणे एवढे सोपे नाही. माझ्या मागे राज्यातील ६ कोटी मराठा बांधव आहेत. जो कोणी ड्रोन उडवून हे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने आमच्या नादी लागू नये. ड्रोन आले होते. ते खूपच उंचावर होतं. ड्रोन टप्प्यात आला तर त्याला खाली पाडणार, असा इशाराही जरांगे यांनी दिला होता.

अंतरवाली सराटीत ड्रोन गिरट्या घालत असल्याच्या प्रकारावर आज ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगेंवरच संशय घेतल्यामुळे खळबळ माजली आहे. ड्रोन कॅमेराचा खोडसाळपणा जरांगेच्याच लोकांनी केला असेल, ड्रोनवरून दिशाभूल करून काहीतरी पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम असू शकतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime Branch: वसुली पोलीस! पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Bihar Election Result: २२७१ लोकांचा विश्वास… पण नियतीचा क्रूर खेळ; मतमोजणीच्या दिवशी उमेदवाराचा मृत्यू

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

SCROLL FOR NEXT