Maratha Reservation saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आंदोलकांसाठी नवी मुंबई सज्ज; पनवेलमध्ये १० लाख बांधवांच्या भोजनाची व्यवस्था

Ruchika Jadhav

सचिन कदम

Panvel News:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील काल मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. २५ जानेवारी रोजी मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल होणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलक मराठा बांधवांचे २५ जानेवारी रोजी दुपारचे जेवण पनवेल येथे होईल. पनवेलमध्ये तब्बल १० लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजाने उचलली आहे. त्यासाठी रायगड जिल्ह्यात तालुकावार बैठका घेतल्या जात आहेत. १० लाख मराठा आंदोलक येतील, अशा अंदाजाने भाकरी, भाजी आणि पुलाव याची व्यवस्था केली जाणार आहे. घराघरांतून भाकऱ्या तयार केल्या जाणार आहेत. स्वयंसेवकांमार्फत जेवण वितरीत केलं जाणार आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या मुक्कामाची तयारी

लोणावळ्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या वाकसई गावातील दोनशे एकर मैदानावर आजपासून तयारी सुरू करण्यात येत आहे. तब्बल वीस जेसीबीच्या सहाय्याने मैदान सपाटीकरणाचं काम सुरू केलं आहे. तर सर्व मराठा बांधवांच्या जेवणाची सोय ही मावळ आणि आजूबाजूच्या परिसरात असणारे प्रत्येक मराठा कुटुंब करणार आहे.

पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली ते मातोरी प्रवास केला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी २१ जानेवारीला मातोरी ते करंजी बाराबाभळी प्रवास करणारेत. मातोरीतून सकाळी ८ वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम / जेवण व जेवण असेल.

तिसरा दिवस 22 जानेवारीला बाराबाभळी ते रांजणगाव प्रवास असेल. चौथ्या दिवशी २३ जानेवारी रोजी रांजणगाव ते चंदन नगर, खराडी बायपास. पाचव्या दिवशी २४ जानेवारी खराडी बायपास ते लोणावळा प्रवास असणार आहे. पुढे २५ तारखेला लोणावळा ते वाशी आणि २६ तारखेला वाशीते मुंबई प्रवास करत आजाद मैदान गाठणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेडा झालाय का? चक्क वाघाच्या पाठीवर बसून फेरफटका, पाकिस्तानमधला Video Viral, नेटकऱ्यांमध्ये संताप

NCLT सोमवारी राकेश वाधवान यांच्या याचिकेवर करणार सुनावणी, काय आहे प्रकरण?

Fraud Case : व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक; नागपूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाण्याची शक्यता

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

SCROLL FOR NEXT