Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: २ क्रेन अन् भला मोठा हार, हिंगोलीत मनोज जरांगे पाटील शांतता रॅलीसाठी सज्ज, कसा असणार दौरा? VIDEO

Rohini Gudaghe

संदीप नागरे, साम टीव्ही हिंगोली

हिंगोलीमधून मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला आजपासून सुरुवात होतेय. हिंगोली जिल्ह्यातून जरांगे पाटील यांची पहिली रॅली निघणार आहे. हिंगोलीत या रॅलीची संपूर्ण तयारी झाली असून हिंगोली शहरातील अकोला बायपास भागात जरांगे पाटील यांच्या स्वागताला दोन मोठे क्रेन आणि भला मोठा हार आणण्यात आलाय.

हिंगोलीमध्ये भव्य शांतता रॅलीचं आयोजन

हिंगोलीमध्ये ठीक अकरा वाजता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं हिंगोली शहरात आगमन झाल्यानंतर या रॅलीला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरातून रॅलीच्या तयारीचा आढावा घेण्यात आलाय. १३ जूनपर्यंत ही शांतता रॅली असणार आहे. शासनाने सगेसोयरे अंमलबजावणीचा शब्द दिलाय, तो पूर्ण करावा अशी जरांगेंची मागणी आहे.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

ही शांतता रॅली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अत्यंत महत्वाची असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. एक महिन्याचा वेळ सरकारला दिला असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. मोठ्या संख्येने मराठा समाजाने या रॅलीत सहभागी व्हावं असल्याचं आवाहन त्यांनी केलंय. शहरात रॅली मार्गावर दोनशेपेक्षा अधिक भोंग्यांसह पोस्टर लावण्यात (Maratha Reservation Rally) आलेत. तर जिल्हा पोलिसांसोबत एक हजार पुरुष तर दोनशे महिला स्वयंसेवक देखील तैनात केले आहेत.

मराठा समाज रॅलीच्या माध्यमातून रस्त्यावर

आधी मूक मोर्चा, त्यानंतर लाखोंच्या सभा आणि आता पुन्हा एकदा मराठा समाज रॅलीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला (Hingoli News) आहे. आता मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय. मराठवाड्याच्या हिंगोलीत आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली (Maratha Aarkshan) आहे. या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असल्याने प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli- Arbaz Patel: 'संपले जरी सारे तरी...' बिग बॉसच्या घरात निक्की- अरबाजचा खेळ सुरूच

Coffee Scrub: चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी 'हा' स्क्रब करा ट्राय...

Marathi News Live Updates : शरद पवार स्वतः इच्छुकांच्या घेणार मुलाखती

Navratri 2024: सणा-सुदीच्या दिवसात झपाट्याने वजन वाढतंय? 'या' पद्धतीने करू शकता कंट्रोल

Kesar Panchmeva Kheer: देवी भरभरून आशीर्वाद देईल आणि प्रसन्न होईल; नैवेद्यात बनवा पंचमेवा खिर

SCROLL FOR NEXT