Manoj Jarange Patil Health Update Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Health Update: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रक्तातील शुगर कमी, चालताही येईना

Manoj Jarange Patil hunger strike : मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना चालताही येत नाही आहे.

Namdeo Kumbhar

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सलग सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केलेय. चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु आहे. पाणी आणि अन्नाचा पोटात कणही गेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यात त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड प्रमाणात थकवा जाणवत आहे. त्यांना चालताही येत नाही.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगे यांनी उपोषणाचं हत्यार उपसल्याने सरकारची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा जाणवत आहे.

मनोज जरांगे यांना चालताही येईना

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने मनोज जरांगे यांना मोठ्या प्रमाणात थकवा जाणवत आहे. त्यांना उपोषण स्थळावरून खाली उतरताना चालताही येत नव्हते. उपोषण स्थळाच्या पायऱ्याखाली उतरले पण त्यांना थकवा आला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे थकवा जाणवत असल्याने खाली बसले. मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची डॉक्टरानी विनंती केली होती, मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

तुम्ही फडणवीस यांच ऐकून गेम करायलेत का?

तुम्ही फडणवीसांच ऐकून गेम करायलेत का? मनोज जरांगे यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना झापले. डॉक्टर सुद्धा सरकारच ऐकून आमचा गेम करायला लागले का ? माझी तब्बेत मेंटन असल्याची खोटी माहिती तुम्ही सरकारला देतायत. माझी शुगर कमी होण्याऐवजी वाढली कशी.? असे म्हणत मनोज जरांगे यांनी डॉक्टरांना धारेवर धरले.

आज दुपारी मनोज जरांगेंच्या उपाचारासाठी डॉक्टरांचे पथक आले होते. यावेळी जरांगे यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना चांगलंच झापलंय. माझा शुगर उपोषणाला बसताना 70 होता मग हा शुगर 83 कसं झालं? असा सवाल उपस्थित करत जरांगे यांनी वैद्यकीय पथकाला जाब विचारला. तुम्ही तुम्ही फडणवीसांच ऐकून गेम करायलेत का असा सवालही जरांगे यांनी डॉक्टरांना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT