Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: उपोषणावर ठाम, निवडणुकीत फोडणार घाम; जरांगे उतरणार विधानसभेच्या मैदानात

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार आहे. कारण मनोज जरांगे थेट विधानसभेच्या तयारीला लागणार आहेत. आरक्षण न मिळाल्यास विधानसभेत तातदीनं मैदानात उतरणार असल्याचा निर्धार जरांगेंनी केलाय.

साम टिव्ही ब्युरो

Manoj Jarange Patil News:

>> विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार आहे. कारण मनोज जरांगे थेट विधानसभेच्या तयारीला लागणार आहेत. आरक्षण न मिळाल्यास विधानसभेत तातदीनं मैदानात उतरणार असल्याचा निर्धार जरांगेंनी केलाय. जरांगेंनी काय रणनीती आखलीय याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, सगे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजाला घेऊन विधानसभेला 100 टक्के पूर्ण ताकदीने उतरणार.

लोकसभा निवडणुकीमुळे कुणबी प्रमाणपत्राचा जीआर रखडला. त्यामुळे नाराज झालेल्या जरांगेंनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून 500 उमेदवार उभे करण्याची खेळी केली. त्यामुळे प्रशासनाला चांगलाच घाम फुटला होता. मात्र जरांगेंनी एक पाऊल मागे घेत आपली तलवार म्यान केली.

मात्र आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना पाडा, असं आवाहन करून जरांगे पाटील यांनी अनेक उमेदवारांचं टेन्शन वाढवलंय. तर आताही सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर नाव घेऊन त्यांना पाडणार असा निर्वाणीला इशारा जरांगेंनी दिलाय.

मनोज जरांगे पाटील यांनी लोकांचे हाल होतील म्हणून नारायण गडावर 900 एकरवरील सभा रद्द केली. मात्र आरक्षण न दिल्यास विधानसभेत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं जाहीर केलंय. यामुळे सरकारची डोकेदुखी तर वाढणार आहे. पण राज्यातली राजकीय समीकरणंही बदलण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election 2025: दुबार मतदारांना झटका, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नेमकं काय पाऊल उचललं?

Homemade Lip Balm: घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा लिपबाम, ओठ होतील मुलायम

Local Body Election : कंडका पडणार! नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता लागली, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Famous Flutist Death: लिव्हर फेलमुळे प्रसिद्ध बासरीवादकाचे निधन; संगीत विश्वावर शोककळा

'कुणासोबतही युती करा, पण भाजपसोबत..' शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, राष्ट्रवादीचे २ गट एकत्र येणार?

SCROLL FOR NEXT