Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट, परळीच्या बड्या नेत्याचं कनेक्शन; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

Maratha Leader Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. या हत्येच्या कटात बीडच्या परळीमधील बड्या नेत्याचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला गेला

  • बीडच्या परळीतील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्यची चर्चा

  • पोलिसांनी अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले

  • या कटासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे उघड

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे. मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचला जात आहे. याप्रकरणी दोन संशयितांना जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भात मध्यरात्री मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी जालना पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. याप्रकरणी जालना पोलिसांनी २ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. मनोज जरांगेंच्या हत्येची ऑफर देणारा बडा नेता बीडच्या परळीतील असल्याची माहिती उघड झाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात बीडच्या परळीमधील एका बड्या नेत्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी ज्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. बीडमध्ये मनोज जरांगेच्या हत्येचा कट रचण्यासाठी बैठका पार पडल्या. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीडमधून दोघांना ताब्यात घेतले. अमोल खुणे आणि दादा गरुड असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अमोल खुणे हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला असून त्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात जरांगेचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील अधिकृत भूमिका मांडतील नंतरच मी माध्यमांसमोर बोलेल तोपर्यंत मी बोलणार नाही असे गंगाधर काळकुटे भूमिकेवर ठाम आहेत.

मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गंगाधर काळकुटे म्हणाले की, 'या विषयावर मी कुठलंही भाष्य करणार नाही. मनोज जरांगे पाटील हे भूमिका मांडतील. मात्र या विषयावर मी आज कुठलंही भाष्य करणार नाही. माफ करा मी आज बोलणार नाही. जरांगे पाटील त्यांची भूमिका मांडतील मग मी माझी भूमिका मांडेल.' पोलिस सध्या या प्रकरणाची माहिती घेत असून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT