मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा करण्यात यावी अशी मागणी अजय बारस्कर यांनी केलीय. अजय बारस्कर यांनी आज अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ७ डिसेंबरपासून राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा होऊन चोवीस तास उलटत नाहीत, तोच अजय बारस्कर यांनी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. अजय बारस्कर यांनी अंबड पोलीस ठाण्यात यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मनोज जरांगे यांनी उपोषणा दरम्यान जालन्याच्या महिला जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप केला. त्यांचे हे वक्तव्य अशीमा मित्तल यांच्यासह महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे होते. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजातील तरुणांना फाशी घेण्यासाठी प्रवृत्त करतात, असा आरोपही अजय बारस्कर यांनी केला.
अजय महाराज यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने जालना पोलिसांनी बारस्कर महाराजांना पुराव्यासह सक्षम हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज अजय बारस्कर महाराज पेन ड्राईव्ह घेऊन पुराव्यासह जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले. यावेळी अजय बारस्कर यांनी मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्याविरोधात अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणे कसे गरजेचे आहे? हे पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न बारस्कर यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.