Kitchen Tips : फ्रिज नसतानाही भाज्या राहतील अनेक दिवस ताज्या; वापरा या सोप्या घरगुती ट्रिक्स

Saam Tv

भाज्या राहतील ताज्या

घरात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. मात्र अनेकदा फ्रिजमध्ये जागा नसते किंवा काही कारणांमुळे फ्रिज उपलब्ध नसतो.अशावेळी भाज्या लवकर सुकतात, खराब होतात किंवा त्यांना बुरशी लागते.यासाठी काही सोप्या टिप्स उपयोगी ठरू शकतात.

store vegetables without fridge | pinterest

बटाटे आणि कांदे

बटाटे आणि कांदे फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. मात्र ते साठवताना दोन्ही एकत्र ठेवू नयेत. त्यांना वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये ठेवा. तसेच थेट सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवा. प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी जाळीदार टोपलीचा वापर करा.

Potatoes and onions | pinterest

टोमॅटो

पिकलेले टोमॅटो काही काळ सामान्य तापमानात ठेवता येतात. यासाठी त्यांना थेट सूर्यप्रकाश किंवा गॅसच्या उष्णतेपासून दूर ठेवा. मात्र वातावरण खूप उष्ण असल्यास ते जास्त काळ बाहेर ठेवू नका.

tomato | pinterest

कोथिंबीर आणि पुदिना

कोथिंबीर,पुदिना यांसारख्या पालेभाज्या लवकर सुकतात. त्या साठवण्यापूर्वी पिवळी किंवा खराब झालेली पाने काढून टाका. त्यानंतर या पालेभाज्या स्वच्छ आणि कोरड्या कापडात किंवा पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. हवेशीर जागेत ठेवल्यास त्या लवकर खराब होण्यापासून वाचू शकतात.

coriander and mint | pinterest

वांगी,भेंडी आणि ढोबळी मिरची

वांगी, भेंडी आणि ढोबळी मिरची यांसारख्या भाज्या कमी प्रमाणात खरेदी करा. त्या कोरड्या, हवेशीर आणि सावलीच्या ठिकाणी ठेवा. साठवण्यापूर्वी भाज्या धुऊन ठेवू नका. त्यावरील अतिरिक्त ओलाव्यामुळे त्या लवकर खराब होऊ शकतात.

Eggplant, okra, and bell pepper | pinterest

बांबू टोपल्यांचा वापर

फ्रिज नसल्यास भाज्या साठवण्यासाठी बांबू, ज्यूट किंवा वायरच्या टोपल्या वापरू शकता. या टोपल्यांमधून हवा खेळती राहते. त्यामुळे बंद प्लास्टिकच्या डब्यांच्या तुलनेत भाज्या चांगल्या राहण्यास मदत होते.

bamboo baskets | pinterest

मातीच्या भांड्यांचा उपयोग

काही भाज्या साठवण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करता येतो. मात्र भांडे स्वच्छ आणि कोरडे असणे आवश्यक आहे. भाज्या ठेवण्याची जागा थेट सूर्यप्रकाश, उष्णता आणि वाफेपासून दूर असावी.

Earthenware Vessels | pinterest

खराब भाज्या वेगळ्या करा

एखादी भाजी मऊ झाली असेल, चिकट झाली असेल किंवा तिला दुर्गंधी येत असेल, तर ती लगेच वेगळी करा. खराब झालेल्या भाज्यांमुळे इतर भाज्याही लवकर खराब होऊ शकतात.

Spoiled vegetables | pinterest

गरजेपुरत्या भाज्या खरेदी करा

फ्रिज नसल्यास एकाच वेळी मोठ्या प्रमाणात भाज्या खरेदी करणे टाळा. आवश्यकतेनुसार थोड्या-थोड्या भाज्या खरेदी करा.

vegetables | pinterest

NEXT : थंडीत इडलीचं पीठ फुलत नाही? मग या 8 भन्नाट टिप्स वापरा, इडली होईल मऊ आणि स्पंजसारखी

8 Genius Tips to Make Soft, Spongy Idlis During Winter | saam tv
येथे क्लिक करा