Manoj Jarange Patil health Update Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपोषणाआधी अचानक काय घडलं? मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल

Manoj Jarange Patil latest news : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

Manoj Jarange Patil health Update : मराठा आरक्षणाच्या लढ्यातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटदुखी आणि तीव्र अशक्तपणा जाणवू लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

सततचे दौरे आणि धावपळीमुळे प्रकृतीवर ताण

मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा झंझावाती दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी ठिकठिकाणी सभा घेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाजबांधवांशी संवाद साधला. त्याशिवाय आगामी आंदोलनाची रणनीती आखली. या सलग दौरे, प्रवास आणि प्रकृतीकडे झालेले दुर्लक्ष यामुळे त्यांच्या शरीरावर प्रचंड ताण आला होता. पश्चिमेकडचा दौरा आटोपून अंतरवाली सराटीत परतल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली.

२९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषण

मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. या उपोषणाची तयारी सुरू असतानाच त्यांची तब्येत बिघडल्याने मराठा समाजबांधव आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या विविध चाचण्या केल्या जात असून, उपोषण सुरू होण्यापूर्वी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhendiche paani: सलग 30 दिवस प्या भेंडीचं पाणी; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा - धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune Politics: पुण्याच्या राजकारणात तयार होतंय नवं समीकरण, कट्टर विरोधक पुन्हा जवळ येणार?

Vastu Tips for Women's Purse: महिलांनी पर्समध्ये ‘या’ ५ वस्तू ठेवल्यास धन- संपत्तीत होईल वाढ

ST Bus Accident : भीषण अपघात! एसटी बस अन् ट्रकची जोरदार धडक; ४५ विद्यार्थी जखमी, ६ जण गंभीर

SCROLL FOR NEXT