Manoj Jarange Health News Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Health News: मनोज जरांगे पाटील भाषण करता करता स्टेजवरच बसले; तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

Manoj Jarange Patil Health Update: डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ते आता दौरा सोडून आराम करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ruchika Jadhav

Maratha Aarakshan:

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मोठा लढा देत आहेत. आरक्षणाबाबत सध्या गावागावात त्यांचे दौरे सुरू आहेत. अशात जरांगेंच्या तब्येतीबात मोठी बातमी समोर आलीये. मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या धाराशिव दौऱ्यावर असून लोहरा तालुक्यातील माकणी येथे भाषण करत होते. भाषण करता करता अचानक ते स्टेजवर बसले. यावेळी त्यांनी स्टेजवर बसून भाषण केलं. त्यानंतर डॉक्टरांनी स्टेजवर त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसेच विश्रांती करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे जरांगे आता दौरा सोडून आराम करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जरांगे यांनी म्हटलं की, "24 डिसेंबरपर्यंत सर्वांनी जागे व्हा. दिलेल्या मुदतीपर्यंत सरकारला आपल्याला आरक्षण द्यावंच लागेल. फक्त सर्वांनी शांतेत आंदोलन करा. शांततेच्या आंदोलनात खूप ताकद आहे. ७० वर्ष झाली तरी आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं. शांततेच्या आंदोलनामुळेच आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आहे. सर्व राजकारण्यांच्या टेबलवर फक्त मराठा आरक्षणाचीच फाईल आहे. हा आपल्या शांततेचा विजय आहे.

कोणी कितीही अडवणूक केली तरी मी खंबीर आहे. मंत्री छगन भुजबळ विरोध करत आहेत त्यांनी आपला विरोध कमी करावा. मराठा तरुणांना आरक्षण मिळत असताना भुजबळ ते होऊ देत नसतील तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशीवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशा शब्दांत जरांगेंनी भुजबळांना इशारा दिला आहे.

आपल्यात असलेली एकजूट कमी होऊ देऊ नका. आपल्या माय बापांनी सर्व पक्षातील नेत्यांना मोठं केलं. त्यांच्या लेकांना मोठं केलं. मात्र आपल्याला कोण मोठं करणार? गरिबांच्य लेकरांना मोठं करायचं असलं तर आपल्याला स्वत: लढा द्यावा लागेल, असं मनोज जरांगे उपस्थितांना संबोधित करताना म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhur Bhandarkar: 'सुपरस्टारची पत्नी होणे सोपे नाही....' ; पाहा मधुर भांडारकरचा आगामी चित्रपट

New Marathi Movie: सोनाली कुलकर्णी आणि स्वप्निल जोशीची केमेस्ट्री; "सुशीला - सुजित" मध्ये नेमकं काय असणार?

IPL 2025: Vaibhav Suryavanshi खरंच १३ वर्षांचा आहे का? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा

Viral Video: मुंबईत रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवर हिंदी बोलण्याची सक्ती, कर्मचाऱ्याची प्रवाशावर दादागिरी; VIDEO

Health Tips: हिवाळ्यात रोज खा मुळा, रोगप्रतिकारक शक्तीसोबत शरीरातील रक्तही वाढेल

SCROLL FOR NEXT