Manoj Jarange Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक; बीड-जालनामध्ये जाळपोळ

Manoj Jarange Health Update: मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे मराठा बांधव आक्रमक झाले आहेत.

Priya More
  • मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस

  • उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

  • मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड आणि जालन्यात मराठा बांधव आक्रमक

  • बीड आणि जालन्यामध्ये महामार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आले

  • मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असताना देखील सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. त्यांनी बीड आणि जालनामध्ये रस्त्यावर उतरत आंदोलन केले आणि जाळपोळ केली. दोन्ही ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालवल्याने मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. जालन्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाले असून टायर जाळून त्यांनी निषेध व्यक्त केला. जालना- जळगाव महामार्गवरील केदारखेडा या ठिकाणी मराठा समाज बांधवानी मध्यरात्री टायर जाळले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे मराठा समाज बांधवांचं म्हणणं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात मराठा बांधवांनी उद्या जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याने मराठा बांधवांनी जिल्हा बंदची हाक दिली. सरकारने लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली. तर दुसरीकडे बीडमध्ये देखील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. बीड- जालना महामार्गावरती मराठा बांधवांनी टायर पेटवले.

बीड ते जालना या महामार्गावरती मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत टायर पेटवत रस्तारोको आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रस्तारोको आंदोलन आणि टायर बाजूला हटवण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले असून शिष्टमंडळ का भेटायला आले नाही? हा रोष व्यक्त करत मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा बांधवांनी निषेध व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

साखरेचे दर पुन्हा कडाडणार! साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज; साखरेचे नेमके दर किती वाढणार?

Sheeps Won Thar: ना मेंढरं विकली, ना व्यवसाय सोडला! मेंढरांसोबतच घरी आली रुबाबदार थार

AI in Medical Science: माणूस 1400 वर्षे जगणार? AI माणसाला दीर्घायुषी करणार? AI मुळे वृद्धत्वाची प्रक्रिया थांबणार?

Mandar Kiwale Case: पाच दिवसआधीच ठरला किवळेच्या हत्येचा प्लॅन; आरोपींचं पोलिसांनाच खुलं आव्हान

SCROLL FOR NEXT