Manoj Jarange Patil On Chandrakant Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Video : चंद्रकांत पाटलांनी सरकारची सुपारी घेऊ नये, ओबीसीतून आरक्षण घेणारच; परभणीत मनोज जरांगे कडाडले

राजेश काटकर

चंद्रकांत पाटील तुम्हाला नातेवाईक आणि सगेसोयरे यांच्यातील फरक कळतो का? पाटील गैरसमज पसरवत आहेत. त्यांनी सरकारची सुपारी घेऊ नये, असं म्हणत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं आहे. जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यातच त्यांची शांतता रॅली परभणीत पोहोचली. यावेळी त्यांची येते सभा झाली. याच सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत. तसेच ओबीसीतून आरक्षण घेणारच, असंही ते म्हणाले.

सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ''मराठा आरक्षसाठी मराठ्यांनी कबर कसलीय.'' मंत्री छगन भुजबळ यांचं नाव घेत ते म्हणाले की, ''छगन भुजबळ यांचं ऐकून ओबीसी नेते सोडले गेले आहेत. आरक्षण असून छगन भुजबळ व सरकारने ओबीसी नेते सोडलेत. ते म्हणाले, छगन भुजबळ म्हणतात माझा अभ्यास नाही. सरकारला माझ्य या परभणीतून सांगता आहे, माझा अंत पाहू नका.

जरांगे म्हणाले, ''ज्या मराठ्यांच्या नोदी आहेत किंवा नाही त्यांनाही आरक्षण द्यायचं आहे. चंद्रकात पाटील मराठा समजात संभ्रम निर्माण करत आहेत. आपली व्याख्या अशी आहे, जाची नोंद निघाली, त्याच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावे.''

ते म्हणाले, ''मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, तर २८८ पाडायचे. जरांगे म्हणाले, ते आता माझ्यावर हल्ला ही करू शकतात. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ओबीसीवर हात उचलू नका. मात्र मराठ्यांच्या लेकराला त्रास देणारा सोडणार नाही.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, ''मराठा आणि कुणबी एकच आहे, सुशील कुमार शिंदे यांनी आदेश काढला. कुणबी व मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, शेती.'' देवेंद्र फडवणीस तुम्ही केसेस मागे घेतो म्हणालात, पण छगन भुजबळ यांचं ऐकू नका. ओबीसीसाठी सगळ्या पक्षातील नेते आमदार, खासदार एक झालेत. मराठा नेत्यांनी एक व्हावे, असंही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT