Jarange Patil sits on hunger strike under extreme heat, continuing protest for Maratha reservation despite government assurances. saam tv
महाराष्ट्र

आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 40 डिग्री उन्हात जरांगेंचं उपोषण

Maratha Reservation Protest Latest Updates Maharashtra: आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेत.... भर उन्हात जरांगे पाटलांनी लेखी आश्वासनानंतरही आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका का घेतलीय....? जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या नाहीत? जरांगेंच्या उपोषणाचा पहिल्या दिवशी नेमकं काय झालं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

रखरखत्या उन्हात, शेताच्या बांधावर बसून जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांच्या मागण्यांसाठी सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला...29 मे ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी दीड तास मनधरणी करूनही तोडगा निघाला नसल्यानं जरांगे उपोषणावर ठाम राहिले...सकाळी 10 वाजता भर उन्हात जरांगेंनी शेताच्याबांधावरच आंदोलनाला सुरुवात केली...तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्त वाढवल्यानं आंदोलकांवर हल्ला करण्याचा विचार असेल तर तो महागात पडेल असा इशाराही जरांगेंनी सरकारला दिला...

दरम्यान राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनीही जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु केलं... त्यामुळे मराठा आंदोलकांचा रोष पाहून सरकारची सकाळपासूनच मोठी धावपळ उडाली...विखे पाटलांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन जरांगेंची भेट घेत लेखी आश्वासनाचे पत्र जरांगेंना दिला... या लेखी आश्वासनात नेमकं काय होतं? पाहूयात...

सरकारचं जरांगेंना लेखी आश्वासन

मराठा आरक्षण कक्ष पुढच्या 1 महिन्यात लागू करण्यात येईल

नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप, जात पडताळणीसाठी हेल्पलाईन नंबर

8 दिवस हेल्पलाईन नंबर सुरू असणार

कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी मार्गदर्शक सूचना जारी

आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसांत अर्थसहाय्य

दरम्यान ड्राफ्टवर अभ्यास करण्यासाठी जरांगेंनी विखे पाटलांकडे वेळ मागितला... मात्र त्याचवेळी सावलीत बसून आंदोलन सुरु ठेवण्यास स्पष्ट नकार देत...सातारा गॅझेट लागू करण्याची ठाम भूमिकाही जरांगेंनी मांडलीय... आता सरकारचा लेखी मसुदा हाती आल्यानंतरही हैदराबाद गॅझेट आणि सगेसोयऱ्यांच्या कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून जरांगेंनी मागे हटवण्यास नकार दिलाय..आता सरकारचा हा मसुदा मराठा आंदोलकांचे समाधान करणार की आरक्षणाचा हा लढा आणखी तीव्र होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT