Manoj Jarange Patil's Tears Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil's Tears : लढा थांबता कामा नये, जरांगेंच्या डोळ्यात अश्रू, इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान भावुक; VIDEO

Maharashtra Assembly Election 2024 : बातमी मनोज जरांगे पाटील भावूक झाल्याची. इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान जरांगे पाटील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी तब्बल 25 तास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

Girish Nikam

मराठा आरक्षणावरुन जरांगे आणि सरकारमध्ये संघर्ष आणखी तीव्र झालाय. आचारसंहिता लागायच्या आत आरक्षण देण्याची मागणी जरांगेनी सरकारकडे केली होती. मात्र सरकारनं जरांगेंच्या इशाऱ्याची सरकार दखल घेतली नाही. आता उमेदवार उभे करुन भाजपचा सुपडा साफ करणार असा इशारा जरांगेंनी दिलाय. वर्षभरापासून उपोषण, रॅली, गावबंदी अशा माध्यमातून लढा देणारे जरांगे आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी तब्बल 25 तास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी ते भावूक झाले होते. लढा थांबता कामा नये म्हणत जरांगे पाटलांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यामुळे काहीकाळ वातावरण गंभीर झालं होतं.

राज्यभरातून हजारो इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी सकाळपासून अंतरवाली सराटी येथे मुलाखतीसाठी गर्दी केली. गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या जिल्हानिहाय इच्छुकांच्या मुलाखती आज सकाळी 9 वाजता संपल्या. लढायचे अन् पाडायचे अशी भूमिका घेत मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

असा आहे जरांगेंचा गेम प्लॅन

गनिमी काव्यानं लढायचं आहे. विजयाचे गणित पाहूनच प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आरक्षित जागेत समविचारी उमेदवारास पाठिंबा देण्यात येणार आणि इतर ठिकाणच्या विरोध करणाऱ्या उमेदवारांना पराभूत करायचे, असे सूत्र जरांगे यांनी समाजाला दिले. मुलाखतीनंतर जरांगे यांनी सर्व इच्छुकांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन चर्चा करत त्याच्यातीलच एक उमेदवार ठरवावा. जर ठरत नसेल तर 30 तारखेला मी उमेदवार देणार, असं जरांगेंनी म्हटलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या याद्या आल्यानंतरच उमेदवारांची घोषणा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टर गेमचेंजर ठरल्याचं पाहायला मिळालं.. आता विधानसभेला खुद्द जरांगे पाटील उमेदवार देणार असल्याने महायुती आणि मविआचं टेन्शन नक्कीच वाढलं आहे. त्यामुळे आता 30 ऑक्टोबरला जरांगे काय धमाका करतात ? जरांगे पाटलांचे कोण उमेदवार असणार याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT