Manoj Jarange Patil associates Income Tax investigation saam tv
महाराष्ट्र

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

Maratha Reservation Stir: जरांगे पाटलांचे सहकारी आयकर विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत... त्यामुळे जरांगेंच्या अडचणी कशा वाढलेत? जरांगेंच्या सहकाऱ्यांवर कोणते आरोप करण्यात आलेत?

Suprim Maskar

सरकारला तीन महिन्यांची मुदत देत जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं उपोषण मागे घेतलं...मात्र उपोषण मागे घेतल्यानंतर माजी सहकाऱ्यांनीच जरांगेंवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले... अशातच आता जरांगेंच्या अडचणी आणखी वाढताना दिसतायत... आयकर विभागाकडून जरांगेंच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहाराची कसून चौकशी होणार आहे.. जरांगेंचे माजी सहकारी अजय बारस्कर आणि अमोल खुणे यांनी 764 कोटींचं सरकारी कंत्राट जरांगेंच्या सहकाऱ्यांनी बेकायदा मिळवल्याचा आरोप केलाय...त्यानंतरच जरांगेचे सहकारी आयकर विभागाच्या रडारवर आलेत....

दरम्यान आयकर विभाग जरांगेंच्या सहाकाऱ्यांची चौकशी कोणत्या मुद्द्यावर करणार? पाहूयात...मराठा आरक्षण आंदोलनाशी जरांगेंच्या सहकाऱ्यांचे आयकर रिटर्न, मालमत्ता, मोठे आर्थिक व्यवहार आणि व्यावसायिक संबंध तपासले जाणार जरांगेंच्या सहकाऱ्यांच्या कंपन्यांना मिळालेल्या सरकारी कंत्राटांचाही तपास होणार छत्रपती संभाजीनगरमधील एका कंपनीला सुमारे 764.7 कोटींची सरकारी कामे मिळाल्याच्या आरोपांचीही तपासणी होणार मात्र सरकारी कंत्राटांमध्ये राजकीय फायदा किंवा ‘क्विड प्रो क्वो’चा पुरावा नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणण आहे काही व्यक्तींची जमीन, मालमत्ता आणि निधीच्या स्रोताचीही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

जरांगेंचं उपोषण स्थगित करण्यासाठी सरकारला तात्पुरतं यश आलयं...मात्र 90 दिवसांच्या अल्टिमेटमनंतर जरांगे पुन्हा एकदा मोठ्या लढ्यासाठी मराठ्यांसह सज्ज होऊ शकतात...मात्र सहकाऱ्यांवर झालेल्या आरोपांमध्ये जर काही आढळलं तर जरांगेंच्या आंदोलनावर त्याचा परिणाम होणार? सरकार जरांगेंना खिंडित गाढण्याची संधी साधणार का? याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम, तडकाफडकी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

राममंदिरानंतर लालबागमध्येही दानपेटीवर डल्ला? आधी कार्यकर्त्यांची मुजोरी आता दानाची चोरी?

दुष्काळाची घोषणा शनिवारी? मुख्यमंत्र्यांचा बुधवारपासून दुष्काळ भागाचा दौरा

सरकारनं शेतकऱ्यांसाठी खूप केलंय, विजबीलही येत नाही; गिरीश महाजनांचा दावा

SCROLL FOR NEXT