Manoj Jarange Morcha Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Morcha: लक्ष्मण हाकेंच्या समर्थकांचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा, नेमकं कारण काय? पाहा VIDEO

Maratha Arakashan: आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. या मुद्द्यावरून मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा काढला आहे. या मोर्चाला लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी पाठिंबा दिला आहे.

Priya More

Summary -

  • मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यशवंत सेनेचा पाठिंबा.

  • लक्ष्मण हाके यांची भूमिका पटली नसल्यामुळे समर्थक नाराज.

  • धनगर समाजाने एसटी आरक्षणाची अंमलबजावणी मागितली.

  • विष्णू कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली ढोल-ताशात पाठिंबा जाहीर.

मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर एकीकडे ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला लक्ष्मण हाके यांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवल्याचे दिसत आहे. राज्यभरातील यशवंत सेनेचे पदाधिकारी आंतरवाली सराटीमध्ये आले आणि त्यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू कुऱ्हाडेंच्या यशवंत सेनेने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. 'जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है|', अशा घोषणाबाजी देत लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी जरांगेंना पाठिंबा दिला. एसटीमधून आरक्षण मिळावे अशी धनगर समाजाची मागणी गेली अनेक वर्षांपासून आहे. यासाठी धनगर समाजाने मनोज जरांगेंना पाठिंबा दिली आहे. यशवंत सेना ही आधी लक्ष्मण हाके यांच्यासोबत होती. पण लक्ष्मण हाके यांची भूमिका पटली नसल्यामुळे त्यांनी एसटी आरक्षणासाठी मनोज जरांगेंना पाठिंबा दिला आहे.

विष्णू कुऱ्हाडे यांनी सांगितले की, 'आमचे सुरूवातीपासून म्हणणं आहे की गोरगरीब आणि गरजवंत मराठा समाज बांधवांना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून आमची धनगर आरक्षणाची मागणी आहे की फक्त अंमलबजावणीची मागणी आहे. आमचे धनगर समाजाचे एसटीचे आरक्षण आहे ते आधीपासून आम्हाला दिले जात आहे. महाराष्ट्रात फक्त अंमलबजावनी करायची आहे. मनोज जरांगे यांनी वेळोवेळी धनगर समाजाचा आणि एसटी आरक्षणचा मुद्दा उपस्थित केला.'

'लक्ष्मण हाके यांनी सुरूवातीला पंढरपूरामध्ये उपोषण केले होते तेव्हा त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते. पण त्यानंतर त्यांनी एसटी आरक्षणाचा मुद्दा कुठेच आतापर्यंत काढला नाही.', असे विष्णू कुऱ्हाडे यांनी सांगितले. याचमुळे धनगर समाजाच्या विष्णू कुऱ्हाडे यांनी आता मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला आहे. ढोल वाजवत ते आंतरवालीमध्ये आले आणि त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savalyachi Janu Savali: भैरवी आणि सावली समोरासमोर येणार; 'सावळ्याची जणू सावली'मध्ये घडणार गौप्यस्फोट

Crime: महिला पोलिसावर ७ वर्षे गँगरेप, ड्युटी असल्याचे सांगून हॉटेलवर न्यायचे अन् ड्रग्ज द्यायचे; वरिष्ठ अधिकाऱ्यासह सहकाऱ्यांवर आरोप

Maharashtra Live News Update: संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय- सुनील तटकरे

Kokan Railway : कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी! प्रवाशी मित्रांनो लक्ष द्या, दिवा–सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळापत्रक मोठा बदल

Glycerin Side Effects : चेहऱ्यावर ग्लिसरीनचा अतिवापर करताय? मग जाणून घ्या हे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT