मनोज जरांगेंचं भगवं वादळ मुंबईत धडकलं आणि मुंबईची वाहतूक व्यवस्थाच कोलमडून गेली.. एवढंच नाही तर जरांगेंच्या आझाद मैदानावरील उपोषणाने सरकारची कोंडी झालीय.. तर मुंबईकरांचेही हाल होत आहेत.. त्यावरुन राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाच घेरलंय...
एवढंच नाही तर एकनाथ शिंदेच आंदोलकांना रसद पुरवत असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय..
एकीकडे जरांगेंच्या आंदोलनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रसद पुरवत असल्याची अप्रत्यक्ष टीका विरोधकांकडून होत आहे.. दरम्यान मनोज जरांगेंनी फडणवीसच शिंदेंना काम करु देत नव्हते याचा पुनरुच्चार केलाय...
खरंतर एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती.. त्यानंतर वाशीत मनोज जरांगेंच्या हाती सगे सोयरे अधिसूचना देत गुलाल उधळला होता.. आता तेच आश्वासन पूर्ण न झाल्यानं आरक्षणाचा तिढा वाढलाय... मात्र विरोधकांच्या आरोपानुसार मनोज जरांगेंच्या मागे एकनाथ शिंदे असतील तर त्यांचा नेमका उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित होतोय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.