Manoj Jarange Maratha reservation Agitation During ram temple inauguration Saam tv
महाराष्ट्र

Maratha Aarakshan: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा भाजपला फटका? मराठा मोर्चामुळे श्रीराम मंदिर उद्घाटनाचा लोकांना विसर पडणार?

Manoj Jarange Maratha reservation : बीडच्या इशारा सभेतून जरांगे यांनी राज्य सरकारलाच नाही तर थेट केंद्रात असलेल्या भाजपा सरकारला सुद्धा आव्हान दिलं आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोललं जात आहे.

लक्ष्मण सोळुंके

Manoj Jarange latest News :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदाकाठच्या अंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाला आता जनआंदोलनाचं स्वरूप आलं आहे. बीडच्या इशारा सभेतून जरांगे यांनी राज्य सरकारलाच नाही तर थेट केंद्रात असलेल्या भाजपा सरकारला सुद्धा आव्हान दिलं आहे. त्यामुळे राज्यासह केंद्रातील भाजपच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोललं जात आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांनी बीडमधील इशारा सभेतून थेट 20 जानेवारीला मुंबई गाठण्याचं आव्हान मराठा समाजाला केलं. त्यामुळे भाजपचा अयोध्या येथील राम मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम अडचणीत आल्याचं बोललं जात आहे.

राम मंदिराच्या नावावर भाजप सत्तेत आल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. त्याचं राम मंदिराचा पूजन सोहळा हा 17 जानेवारी ते 22 जानेवारीदरम्यान अयोध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे यांचे मुंबईत उपोषण

या कार्यक्रमाकडे भाजप देशात पन्नास वर्ष राज्य करता येईल, ही स्वप्न पाहत असताना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी याचं कार्यक्रमादरम्यान मनोज जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष आता जरांगे यांच्या आंदोलनाकडे लागलं आहे.

जरांगे यांचे उपोषण, राम मंदिराचा सोहळा एकाचवेळी

जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यासह देशातील राम मंदिराच्या सोहळ्याची तयारी करणाऱ्या भाजपसमोर मोठी अडचण निर्माण झाल्याचे बोललं जात आहे. महाराष्ट्रात राममंदिराच्या चर्चेपेक्षा मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत असल्याने भाजपसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार आता हा प्रश्न कसा सोडवते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

Maharashtra Live News Update: दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल

RSS @100 years : मीनाक्षीपुरम ते रामजन्मभूमी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी प्रवास, समाजामुळे यशस्वी वाटचाल

Dussehra 2025: रावण दहनाची राख घरात ठेवण्याचे खास उपाय, मिळेल धनलाभ आणि यश

Pune Crime: निलेश घायवळ अन् टोळीला पोलिसांचा मोठा दणका; १० बँक खाती गोठवली, प्रॉपर्टीसुद्धा सील

SCROLL FOR NEXT