Manoj Jarange and Chhagan Bhujbal Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News: जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा भुजबळ; ओबीसी महामंडळ खाल्ल्याचा आरोप

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal: लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकादा आक्रमक झाले आहेत. निवडणुका संपताच छगन भुजबळांनी ओबीसी महामंडळ खाल्ल्याचा गंभीर आरोप केलाय.

Sandeep Gawade

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक झाली आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर तोफ डागलीय. छगन भुजबळांनी ओबीसी महामंडळ खाल्ल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. याशिवाय हलक्यात घेऊ नका असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील विरूद्ध छगन भुजबळ असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूकीच्या काळात थेट राजकीय भूमिका न घेणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी निवडणूक संपताच पुन्हा एकदा भुजबळांवर जोरदार प्रहार केलाय. मला बधीर समजता का? असा सवाल करत अतिशय खालच्या पातळीवर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना सुनावलं आहे.

मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत राज्यभर रान पेटवलं होतं. तर दुसरीकडे छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार सभांच्या माध्यमातून मनोज जरांगेंना उत्तर दिलं होतं. जरांगेंनी केवळ भुजबळच नव्हे तर सरकारलाही सुनावलंय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हलक्यात घेऊ नका असा थेट इशाराच जरांगेंनी दिलाय.

लोकसभा निवडणूक संपताच जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यातच त्यांनी 4 जूनला अंतरवली सराटीत उपोषणाची हाक दिलीय. यानिमित्तानं त्यांनी पुन्हा भुजबळांना निशाण्यावर घेतलंय. त्यामुळे येत्या काळात जरांगे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष पेटणार हे नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT