Manoj Jarange Patil Health Update  saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : ४ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगेंची प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे अपडेट; VIDEO

Manoj Jarange Health Update : मागण्या पूर्ण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. त्यानंतर ते उपचारासाठी थेट छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले. त्यांची हेल्थ अपडेट समोर आली आहे.

Yash Shirke

  • मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आणि उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले.

  • सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती नाजूक झाली असून ॲम्बुलन्समध्येच त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

  • डॉक्टरांच्या मते, मनोज जरांगे यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

Manoj Jarange Patil Health Update : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आंदोलन थांबवण्याचा घोषणेनंतर जरांगे पाटील मुंबईत न थांबता थेट छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले. उपचारासाठी त्यांना ॲम्बुलन्समधून छत्रपती संभाजीनगरला नेण्यात आले.

सलग उपोषण केल्याचा परिणाम मनोज जरांगे पाटील यांच्या शरीरावर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर ॲम्बुलन्समध्येच उपचार सुरु करण्यात आले. त्यांच्या तब्येतीची माहिती डॉक्टर विनोद चावरे यांनी दिली. मनोज जरांगे पाटील यांची शारीरिक स्थिती नाजूक असल्याचे विनोद चावरे यांनी सांगितले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषणाचा परिणाम झाला आहे. त्यांना प्रचंड थकवा जाणवत आहे. मनोज जरांगे यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा वेळ लागू शकतो असे डॉक्टर विनोद चावरे यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेल्या ॲम्बुलन्समध्ये जरांगे यांच्यासह डॉक्टर विनोद चावरे देखील होते.

हैदराबाद गॅझेटचा जीआर मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केला. यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना विचारुन, चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगेंनी एका महिन्याची मुदत दिली आहे. या व्यतिरिक्त आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, मराठा आंदोलनासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशा मागण्यादेखील मान्य करण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT