Manoj Jarange Patil  Saam TV
महाराष्ट्र

Santosh Deshmukh case : आरोपीला पळवण्यासाठी सह्याद्रीवर बैठक झाली का? मनोज जरांगे आक्रम, देवेंद्र फडणवीसांना इशारा

Beed Santosh Deshmukh murder case : बीडच्या मोर्चानंतर राज्यभर मराठ्यांचे मोर्चे निघणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यातील मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा, असेही त्यांनी मराठ्यांना सांगितले.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange, Beed Santosh Deshmukh murder case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीड येथे सर्वपक्षीय शांतता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान बीडमधील मोर्चानंतर राज्यभर मराठ्यांचे मोर्चे निघणार असून प्रत्येक जिल्ह्यातील मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही संतोष देशमुख यांच्या आरोपींना सोडू नका, आता ॲक्शन मोडवर या असं आवाहन देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केल आहे . तर दोन-चार दिवसांपूर्वी आरोपीला पळून लावण्यासाठी सह्याद्रीवर बैठक झाली का असा सवाल देखील जरांगे यांनी उपस्थित केला आहे...

बीड जिल्ह्याच्या जनतेचे वतीने मोर्चा आहे. संतोष भैया देशमुख यांच्या लेकीने हाक दिली आहे. कोणीही घरी थांबू नका. आपल्या लेकीने आज आपल्याला हाक दिली आहे. या मोर्चाने सरकारला जाग नाही आली तर आम्ही जाग आणणार आहे. आता संतोष देशमुख यांना आधार द्यायचा तर तुम्ही राजकारण करतात, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आधी हे बंद करावे. आमच्या संतोष भैय्याचा खून झाला येथे सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकाने राजकारण करू नका, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हलगर्जीपणा करायला नाही पाहिजे. जातीवाद पसरेल यासाठी काम करू नका. मुख्यमंत्री यांनी यांना सांभाळू नका , नाहीतर तोंडघशी पडाल. तुम्ही यांना वाचवू नका हे तुमच्याच वर उलटतील. तुम्ही यांना सुट्टी देऊ नका, कोणीही आरोपी असो त्याला आत टाका. आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करायला लागलेत, असा आरोप यावेळी मनोज जरांगेंनी केला.

संतोष देशमुख यांचा एवढा क्रूरपणे खून झाला. मुख्यमंत्री साहेब तुमच्या जवळच्या कुणाचा असा खून झाला असता तर तुम्हाला बघवलं असता का? तुम्हाला ते भेटतात काय? तुम्ही त्यांना संभाळतात काय? आज बीडचा मोर्चा झाल्यानंतर राज्यभर मोर्चे निघणार आहेत. जिल्हा जिल्ह्यातील मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा. प्रत्येक जिल्हयात मोर्चा झाला पाहिजे, असे मनोज जरांगे यांचे आवाहन. एका मुलीच्या न्यायासाठी पूर्ण जिल्हा एकवटला. यात कोणी राजकारण करू नका,आम्ही राजकारण करू नका, असेही ते म्हणाले.

भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता. संतोष देशमुख यांनी इमानदारीने काम केलं, देवेंद्र फडणवीस तुम्ही आरोपी लपून ठेवून हे फळ देणार आहे का? देवेंद्र फडणवीस तुमचे ग्राउंड लेव्हलचे कार्यकर्ते मरायला लागले आणि तुम्ही नेते सांभाळायला लागले. दोन-चार दिवसांपूर्वी आरोपीला पळून लावण्यासाठी सह्याद्रीवर बैठक झाली का? सरकारने गोरगरीब मराठ्यांना मारायचा ठरवलं. आम्हाला यात राजकारण करायचं नाही, पण तुम्हाला आरोपी सापडत नाही. तुम्ही फक्त मीडियात येऊन आरोपीला सोडणार नाही, असे सांगतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT