MANOJ JARANGE CORE COMMITTEE MEMBER SANJAY KATARE FACES saam tv
महाराष्ट्र

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

Manoj Jarange Core Committee Member Sanjay Katare ₹4.90 Crore Fine: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय नानासाहेब कटारे यांच्यावरील ४ कोटी ९० लाख ७२ हजार २०० रुपयांचा दंड पुन्हा कायम करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई झाली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय नानासाहेब कटारे यांना ४ कोटी ९० लाख ७२ हजार २०० रुपयांच्या दंडातून वगळण्याचा तत्कालीन तहसीलदारांचा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. २००० ब्रास अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील मूळ दंड कायम ठेवत ही रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अंबड येथील उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दिले आहेत.

साष्टपिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन प्रकरणी १८ व्यक्तींवर 16 एप्रिल 2023 रोजी हा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, संजय कटारे यांच्या आक्षेपानंतर तत्कालीन तहसीलदारांनी त्यांचे नाव दंडाच्या कारवाईतून वगळले होते. या निर्णयाविरोधात अजय महाराज बारस्कर यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडून झालेल्या चौकशीत तत्कालीन तहसीलदार आणि संबंधित गौण खनिज शाखेतील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.

उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी २१ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार कटारे यांना वगळणारा मागील आदेश रद्द करण्यात आला असून, गट क्रमांक २६२ वरील ४ कोटी ९० लाख ७२ हजार २०० रुपयांचा बोजा पूर्ववत करण्यात आला आहे. तसेच तत्कालीन तहसीलदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT