Manoj Jarange Patil at Azad Maidan alleges BJP, Shinde, and Ajit Pawar MLAs are unhappy with Fadnavis over Maratha quota saamtv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणावरून भाजपचेच मंत्री,आमदार फडणवीसांवर नाराज; मनोज जरांगेंचा दावा

BJP MLAs Disappoint On Devendra Fadnavis : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.भाजपमधील काही मंत्री आणि आमदार फडणवीसांवर नाराज असल्याचा दावा जरांगे यांनी आंदोलनावेळी केलाय

Bharat Jadhav

  • मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.

  • आंदोलनासाठी मिळालेल्या मुदतीत आणखी एका दिवसाची वाढ.

  • भाजप, शिंदे व अजित पवार गटातील काही आमदार फडणवीसांवर नाराज.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. जरांगेंना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती. पण आता त्यांना आंदोलनासाठी आणखी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आलीय. यादरम्यान साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजक दावा केलाय.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपमधील काही मंत्री आणि आमदार फडणवीसांवर नाराज आहेत. इतकेच नाही तर अजित पवार गट आणि शिंदे गटातील काही आमदार सुद्धा नाराज असल्याचं जरांगे म्हणालेत. मनोज जरांगेंच्या दाव्यामुळे राजकी वर्तुळात मोठी खळबळ माजणार आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलन उग्र रुप घेताना दिसत आहे. हजारोंच्या संख्येने मराठा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत.

मुंबई शहराचे प्रत्येक रस्ते भगवे झालेत. आंदोलनाची तीव्रता पाहता सरकार सक्रीय झाले असून सरकारकडून आरक्षणाबाबत हालचाली केल्या जात आहेत. आज सकाळी शिंदे समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे आणि शिंदे समितीमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरली. कुणबी प्रमाणपत्राबाबत कोणती वेळ वाढवून देण्यास आपण तयार नसल्याचं जरांगे यांनी सांगितलंय. यानंतर संध्याकाळी साम टीव्हीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मनोज जरांगे यांनी खळबळजनक दावा केलाय.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपमधील काही मराठा आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत, असा दावा त्यांनी केलाय. इतकेच नाही तरी महायुतीमधील अजित पवार गट आणि शिंदे गटातील आमदार सुद्धा नाराज आहेत. फडणवीस हे निकृष्टपणे सरकार चालवत आहेत. भाजपचे आमदार, मंत्री आणि या दोन्ही पक्षांतील नेतेही नाराज आहेत, असं जरांगे पाटील म्हणालेत.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील

माझे मराठे शांत आहेत, मुंबईही शांत आहे. काही वेगळ्या वळणावर गेले नाहीये. आमच्या एका मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. शिवनेरीलाही आमच्या लेकराचा मृत्यू झाला. पण तो मृत्यू नसून खून आहे. हा खून फडणवीस यांनी केलाय. मी आणखी संयमी आहे. मराठे संयमी आहेत. पण सोईसुविधा केल्या असत्या तर असं घडलं नसतं. आता कुणाच्या तरी आईचं लेकरू गेलं ना. त्याची आई शापशिव्या देईलच.

सकाळी शिंदे समितीसोबत झालेल्या चर्चेत काही समाधानकारक उत्तर मिळालं नाहीये. त्यांना आपण वेळ वाढवून देण्यास नकार दिलाय. समितीने १३ महिने अभ्यास केलाय आता कशाला वेळ हवा. हैदराबाद, सातारा तातडीने हवं आहे. मराठवाड्यातला मराठा सगळे कुणबी आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही तेच आहे. हातात परवानगी असूनही देत नाही, असं जरांगे पाटील म्हणालेत. मराठ्यांना पुढच्या शनिवार-रविवारपर्यंत शांत राहा मैदानात गाड्या लावा. आझाद मैदानात शांत बसा. आरक्षण घेऊनच जाऊ, असे आवाहन जरांगेंनी केले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ कोणती?

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

Laxman Hake: अंगावर धावून आले आणि मारण्याचा प्रयत्न केला.." पाहा लक्ष्मण हाकेंसोबत नेमकं काय घडलं|VIDEO

Manoj Jarange Patil Protest Live Updates: मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी सुरू

Monday Horoscope : गौरी-गणपतीत उजळणार नशीब, ५ राशींच्या हाती येईल अचानक पैसा

SCROLL FOR NEXT