Manohar Joshi
Manohar Joshi Saam Tv
महाराष्ट्र

Manohar Joshi Health Update: मनोहर जोशी यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; प्रकृती स्थिर, उपचार सुरु

Ruchika Jadhav

निवृत्ती बाबर

Manohar Joshi News Today: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृती बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या ते हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. हिंदुजा रुग्णालय प्रशासनाकडून काल रात्री ही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 22 मे रोजी मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Latest Manohar Joshi Health Update News)

मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी आहेत. अशात २२ मे रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपल्या प्रकृतीमुळे गेल्या काही काळापासून मनोहर जोशी राजकारणात सक्रिय नाहीत.

मनोहर जोशी (Mahohar Joshi) हे मूळचे बीडचे असून त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावात झाला. शिक्षणानिमित्त मनोहर जोशी हे मुंबईत स्थलांतरीत झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणूनही नोकरी केली.

विधानपरिषदेत शिवसेनेकडून निवडून येत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. मुंबईच्या महापौरपदही त्यांनी काम केलं आहे. यावेळी 1976 ते 1977 या कार्यकाळात त्यांनी उत्तम कामे केली. तसेच शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs CSK: आज चेन्नई-पंजाब भिडणार! कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् मॅच प्रेडिक्शन

Today's Marathi News Live : मोठी बातमी! नसीम खान यांना काँग्रेस पक्षाकडून पुन्हा स्टार प्रचारकची जबाबदारी

Pune Crime: विश्वासू नोकरानेच केला हात साफ! साथीदारांच्या मदतीने तब्बल २१ तोळे सोने लंपास; १२ तासात आरोपी अटकेत

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

Ghee Benefits : खा तूप येईल रुप; आरोग्यावर होणारे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहितीच नसतील

SCROLL FOR NEXT