Manmad News Saam tv
महाराष्ट्र

Manmad News: माथेफिरुने धावत्या ट्रेनवर मारली उडी; मनमाड रेल्‍वेस्‍थानकावरील थरारक घटना

माथेफिरुने धावत्या ट्रेनवर मारली उडी; मनमाड रेल्‍वेस्‍थानकावरील थरारक घटना

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : नेहमी वरदड असलेल्‍या रेल्‍वे स्‍थानकावर माथेफिरूने रेल्‍वे येताच उडी मारली. अचानक घडलेल्‍या या प्रकाराने (Railway) रेल्‍वे स्‍थानकावर उभ्‍या असलेल्‍या नागरीकांच्‍या काळजाचा ठोका चुकला होता. या सर्व गोंधलात (Manmad) ट्रेन सुमारे अर्धा तास लेट झाली. (Maharashtra News)

मनमाड रेल्वे स्थानकात दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. रेल्‍वे स्‍थानकावर एक माथेफिरु रेल्वे प्लॅटर्फॉमवरील पत्र्याच्या शेडवर चढला. हा प्रकार काहींच्‍या लक्षात आल्‍यानंतर स्‍थानकावरील नागरीकांनी आरडाओरड केली. दरम्‍यान रेल्‍वे पोलिसांनी त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो काही केल्‍या खाली उतरत नव्‍हता.

वायरवर पडल्‍याने झाला स्‍फोट

माथेफिरूला खाली उतरविण्याचा प्रयत्‍न सुरु असतांना प्लॅटफॉर्म नंबर दोनवर नवी दिल्ली- कर्नाटक एक्सप्रेस गाडी आली. याच दरम्‍यान माथेफिरुने गाडीवर उडी मारली. मात्र तो ओव्हरहेड वायरवर पडल्याने स्फोट होऊन गाडीच्या टपावर पडून गंभीर जखमी झाला. त्‍याला तातडीने रेल्वे पोलिस, आरपीएफ यांनी त्याला खाली उतरवत उपचारासाठी नाशिक येथे हलविले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोरंट पॉवरचे वृक्षतोड उबाठा शिवसेनेने पाडली बंद

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT