Yewla Accident Saam tv
महाराष्ट्र

Yewla Accident: चालकाला आली डुलकी; भरधाव कार उतरली नाल्यात, १२ जण जखमी

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मनमाडकडून येवला येथे प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी वाहतुक करणाऱ्या कारला पहाटेच्या सुमारास अपघात झाला. (Manmad) मनमाडहुन काही प्रवाशांना घेऊन सकाळच्या सुमारास जात असताना येवल्याजवळ निजधाम जवळच्या पुलाजवळील नाल्यात गेल्याने झालेल्या (Accident) अपघातात १२ प्रवाशी जखमी झाले आहेत. चालकाला डुलकी आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

मनमाड येथील रेल्वेचा उड्डाण पूल पडल्याने मनमाड ते येवला- शिर्डी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रेल्वेने मनमाडला येवला शिर्डीला जाणारे प्रवाशी उड्डाण पूल संपणाऱ्या ठिकाणी येऊन थांबत असतात. या ठिकाणाहून अनेक खाजगी गाड्यातून वाहतूक होत असते. उड्डाण पूल पडल्याने या ठिकाणाहून खाजगी वाहतूक सुरू झाली. त्यामुळे मनमाडहुन येवला येथे प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी वाहतुक करणारी कार मनमाडहुन काही प्रवाशांना घेऊन सकाळच्या सुमारास मार्गस्थ झाली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२ प्रवाशी गंभीर जखमी 

गाडी निघाल्यानंतर येवलानजिक निजधाम जवळच्या पुलाजवळील नाल्यात गेल्याने हा अपघात झाला. कार चालकाला डुलकी (Car Accident) लागल्याने भरधाव कार थेट रस्ता सोडून नाल्यात गेल्याचे बोलले जात आहे. या अपघातात १२ जण जखमी झाले असून यातील काही प्रवाशी हे सुरत येथील असल्याचे समजते. जखमी १२ पैकी २ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बाहेरगावी उपचारासाठी हलविण्यात आले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

Maharashtra News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाशिम दौरा रद्द

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

SCROLL FOR NEXT