Manipur Violence : आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मणिपूरमध्ये संध्या हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचारादरम्या तेथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वसतीगृहात महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकले होते. या विद्यार्थ्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणले आहे. मणिपूरमधून विशेष विमानाने हे मणिपूरमधील विद्यार्थी मुंबईत सुखरुप दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील या एकूण २५ विद्यार्थ्यांना आज इंफाळ मधून विशेष विमानाने आधी गुहाटीला आणि नंतर गुहाटीवरून थेट मुंबईत विशेष विमानाने आणले. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच निर्देश दिले होते आणि आज या विद्यार्थ्यांना आपल्या मायभूमीत सुखरूप एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
मुंबईत दाखल झाल्यानतंर या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी भारतीय सैन्य दल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली होती चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी बंगळुरू येथून मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. तेथील सर्व विद्यार्थ्यांना आधी मणिपूर येथील शिवसेना भवनात सुखरूप आणण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून त्यांची विचारपूस केली होती. तुम्हाला खायला अन्न आणि बाकीच्या वस्तू देण्यात आल्या आहेत का अशी विचारणा त्यांनी केली होती. त्यानंतर आज या सर्वांना महाराष्ट्रात सुखरुप परत आणले आहे.
शरद पवारांनी केला होता गृहमंत्र्यांना फोन
णिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पुढाकार घेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुध्वणीवरून संपर्क साधला होता. मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणण्याची विनंती पवारांनी फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर फडणवीसांनी पवारांना सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्याचे अश्वासन दिले होते.
मणिपूरमध्ये NEET-UG परीक्षा पुढे ढकलली
कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता मणिपूरमध्ये 7 मे रोजी होणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) शनिवारी सांगितले की ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे मणिपूरमध्ये आहेत त्यांची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
हिंसाचारात आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू
मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारामुळे आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की अधिकृत मृतांची संख्या 54 आहे, त्यापैकी 16 मृतदेह चर्चंदपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, तर 15 मृतदेह इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू वैद्यकीय विज्ञान संस्थेत ठेवण्यात आले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.