Manipur clashes: मणिपूर महिला अत्याचार प्रकरणाचा देशभर पडसाद उमटत आहेत. या अत्याचाराच्या विरोधात देशभरात निषेध नोंदवला जात आहे. मणिपुरातील घटनेच्या विरोधात सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींनी निषेध नोंदवला आहे. नाशिकच्या सटाणा तालुक्यातही नागरिकांनी मणिपूर अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा काढला. मात्र, मणिपूर अत्याचाराच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सटाण्यात मणिपूर अत्याचाराच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. सटाण्यातील नागरिकांनी विंचूर-प्रकाशा महामार्ग रोखत केला वाहनावर दगडफेक केली. यावेळी हिंसक झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला.
वंचित बहुजन आघाडी आणि आदिवासी संघटनांनी अर्धनग्न मोर्चा काढला होता. निवेदन देवून परतत असताना मोर्चेकऱ्यांनी रास्ता केला. आमदार आदिवासी असताना सहभागी न झालेल्या जमाव संतप्त झाला होता. रस्त्यावर वाहनांची तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी घटनास्थळी तगडा बंदोबस्त लावला.
धुळ्यातही मणिपूर महिला अत्याचार प्रकरणाचे पडसाद
मणिपूर येथील महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरात आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. यावेळी या घटनेच्या निषेधार्थ पिंपळनेर शहरात तहसील कार्यालयावर आदिवासी संघटनांतर्फे भव्य निषेध मोर्चादेखील काढण्यात आला.
या मोर्चामध्ये विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायवाय मिळाले. यावेळी मनिपूर घटनेच्या निषेधार्थ फलक झळकवत हा निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी या आंदोलनकर्त्यांनी तहसील अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.