Pune Terrorist News: पुणे दहशतवादी प्रकरणामध्ये आणखी एकाला रत्नागिरीतून अटक

या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.
Pune Terrorist News
Pune Terrorist NewsSaam Tv
Published On

Pune Crime News:  पुणे दहशतवादी प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी येथून या दहशतवादीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे.

दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर एटीएसने आता रत्नागिरीतून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. आर्थिक रसद पुरवण्याच्या आरोपावरून या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

Pune Terrorist News
Kolhapur News : पाणी आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या...., सुळकुड ग्रामस्थ घुसले कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात, आजच महत्त्वपूर्ण बैठक

पुण्यातल्या कोथरुड परिसरातून अटक

पुण्यातल्या कोथरुड परिसरातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्याला एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने या दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणाचा एटीएसकडून (ATS) कसून तपास सुरु असून आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांना पुण्यामध्ये राहण्यासाठी आश्रय देणाऱ्याला बुधवारी एटीएसने अटक केली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे दोन साथीदार मात्र अद्याप फरार आहेत. एटीएसकडून त्यांचा शोध सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून टेंन्ट जप्त करण्यात आले आहे. जंगल परिसरामध्ये राहण्यासाठी ते या टेंटचा वापर करत होते.

Pune Terrorist News
Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल, महात्मा गांधींबद्दलचं वक्तव्य भोवलं; काँग्रेसकडून अटकेची मागणी

मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (२४ वर्षे), मोहमम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (२३ वर्षे) अशी पुण्याच्या कोथरुड भागातून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. हे दहशतवादी कोंढव्यातील मीठानगरमध्ये राहत होते. हे दोघेही पुण्यात बॉम्बस्फोट घडवणार होते. या दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची प्रशिक्षण आणि चाचणी केल्याची माहिती एटीएसने कोर्टात दिली होती. त्यानंतर या दहशतवाद्यांविरोधात दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) कलमवाढ करण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com