Agriculture Minister Manikrao Kokate under intense scrutiny after a viral video showed him playing an online card game in the Assembly; past farmer remarks fuel resignation calls. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

कोकाटेंची पाटीलकी जाणार? कृषिमंत्री शेतकऱ्यांबद्दल काय अन केव्हा बरळले? वाचा सविस्तर

Why is Manikrao Kokate facing resignation calls after card game video?: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात. ऑनलाइन कार्ड गेम व्हिडिओ, शेतकऱ्यांवरील वादग्रस्त विधाने आणि पक्षातील असंतोषामुळे राजीनाम्याची चर्चा जोरात.

Namdeo Kumbhar

  • कोकाटेंच्या रमी गेममुळे मंत्रिपदावर संकट! राजीनामा की दिलगिरी?

  • शेतकऱ्यांचा अपमान ते ऑनलाइन गेम: कोकाटेंच्या वादांचा पंचनामा

  • रमी गेममुळे कोकाटेंचे मंत्रिपद डळमळीत! राजीनाम्याची चर्चा तापली

  • वादग्रस्त कोकाटे: शेतकऱ्यांचा अवमान ते सभागृहातील गेम

Full list of controversial statements by Manikrao Kokate about farmers : ऑनलाइन कार्डच्या गेममुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजकीय गेम होणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली. अधिवेशनाच्या काळात सभागृहात माणिकराव कोकाटे ऑनलाइन गेम खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. त्यानंतर कृषीमंत्री पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. सिन्नरचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे हे काही पहिल्यांदाच वादात अडकले नाहीत. कोकाटे आणि वाद हे जुनेच नाते आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधाने करत सरकारच्या अडचणी वाढवल्या होत्याच. त्यात ऑनलाइन गेमची भर पडली. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली जात आहे. विरोधकांच्या तीव्र आरोपांमुळे कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. पण त्यांनी आतापर्यंत कोण कोणती वादग्रस्त विधाने केली? कृषीमंत्री आतापर्यंत कधी आणि का वादात अडकले? याबाबत जाणून घेऊयात..

सभागृहातच ऑनलाइन गेम?

नुकतेच राज्यात पावसाळी अधिवेशन पार पडले. पण अधिवेशन संपता संपता कोकाटे पुन्हा चर्चेत आले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात ऑनलाइन कार्डचा गेम खेळत असल्याचा व्हिडिओ 20 जुलै 2025 रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार शेअर केला. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला. हे इतक्यावरच थांबले नाही, लातूरमध्ये कोकाटेंचा निषेध व्यक्त करण्यासाठी आलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामध्ये सूरज चव्हाण यांचाही समावेश होता. छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला अन् सरकार आणखी अडचणीत पडले. आता डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांनी चव्हाण यांचा राजीनामा घेतलाय. तर कोकाटेंशी फोनवर चर्चा केली. कोकाटे आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली? हे समोर आलेले नाही, पण आज तातडीची पत्रकार परिषद होत आहे. ते राजीनामा देणार की दिलगिरी व्यक्त करणार? याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. वाचा याआधी कोकाटेंनी केलेली वादग्रस्त विधाने -

भिकारीही एक रुपया घेत नाही

फेब्रुवारी २०२५ मध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. पिक विम्यावरून त्यांनी शेतकऱ्यांना अपमान वाटावे असे विधान केले होते. त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती, त्यामुळे मोठा वाद झाला होता. भिकारीही एक रुपया घेत नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती.

शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य -

एप्रिल २०२५ मध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर कर्जमाफीच्या अपेक्षेने कर्ज फेड न केल्याचा आणि लग्नांसाठी खर्च केल्याचा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. कोकाटेंना अजित पवार यांच्याकडून ताकीद मिळाली होती.

ढेकळांचे पंचनामे करायचे का?

मे महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर, कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत वादग्रस्त विधान केले. "ढेकळांचे पंचनामे करायचे का?" हे विधान करत कोकाटेंनी वाद ओढावून घेतला होता. त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि विरोधी पक्षांनी कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली. विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली, परंतु कोकाटे यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना आपले विधान गैरसमजातून चुकीचे समजले गेले म्हटले.

कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी

३१ मे रोजी पुन्हा एकदा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधाने केले. छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना कोकाटे यांनी कृषी खात्याचे महत्त्व कमी लेखले. "कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खाते जाणीवपूर्वक दिले आहे." असे विधान त्यांनी केले होते. त्यामुळे कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.

१९९५ चा आवास घोटाळा:

20 फेब्रुवारी 2025 रोजी, नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील यांना सरकारी कोट्यातील फ्लॅट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड ठोठावला. कोकाटे यांना दोन तासांत जामीन मिळाला आणि मार्च 2025 मध्ये सत्र न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली, ज्यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद तूर्तास वाचले.

कोकाटेंचे मंत्रिपद जाणार का?

अजित पवार आणि महायुती सरकारने माणिकराव कोकाटे यांच्याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही, पण त्यांना समज देण्यात आली आहे. कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी अजित पवार लवकरच निर्णय घेतील असे संकेत दिले. आज कोकाटे पत्रकार परिषद घेत आहेत, त्यामध्ये ते दिलगिरी व्यक्त करणार की राजीनामा देणार, याची जोरदार चर्चा सुरू आहे.

माणिकराव कोकाटे सभागृहात कोणता गेम खेळताना आढळले?

माणिकराव कोकाटे विधानसभेत ऑनलाइन रमी गेम खेळताना आढळल्याचा दावा राजकीय नेत्यांनी केला आहे.

कोकाटेंच्या रमी गेम व्हिडिओवर कोणत्या पक्षाच्या आमदाराने टीका केली?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर करत टीका केली.

कोकाटेंच्या शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त विधानांपैकी एक उदाहरण काय?

फेब्रुवारी 2025 मध्ये कोकाटे यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करत "भिकारीही एक रुपया घेत नाही" असे विधान केले.

कोकाटेंच्या ऑनलाइन गेम प्रकरणानंतर लातूरमध्ये काय घडले?

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोकाटेंच्या निषेधार्थ सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.

कोकाटेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवार यांनी काय पाऊल उचलले?

अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला आणि कोकाटेंशी फोनवर चर्चा केली, पण ठोस निर्णय अद्याप समोर आलेला नाही.

कोकाटेंना 1995 च्या आवास घोटाळ्याप्रकरणी काय शिक्षा झाली?

नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, पण सत्र न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली.

कोकाटेंच्या "कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी" या विधानाचा परिणाम काय झाला?

या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Cricketers: भारताचे टॉप ५ महान क्रिकेटपटू कोण? शास्त्रींच्या यादीत विराट कोहली; वर्ल्डकप विजेत्या रोहित शर्माला वगळलं

Heart Health: पेनकिलर, अँटीबायोटिक्स खाण्याची सवय आहे? 'ही' औषधे घेतल्याने हृदयावर होतो परिणाम

Maharashtra Live News Update: निवासी आश्रम शाळेतील 8 वर्षाच्या मुलाची हत्या,जालन्यात खळबळ

Pankaj Deshmukh Death Case: आमदार कुटेंच्या कार चालकाचा संशयस्पद मृत्यू प्रकरण; भाजप कार्यकर्त्यांकडून देशमुख कुटुंबियांनी धमक्या

Credit Card: गर्दीत उभे राहाल, कंगाल व्हाल? टॅप अँड पे सुरू असल्यास खातं होईल रिकामी?

SCROLL FOR NEXT