तमाशा कलावंत रघुवीर खेडकर. 
महाराष्ट्र

आता मंगला बनसोडे, खेडकरांचा राजकीय वग, राष्ट्रवादीत प्रवेश

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर ः अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष, प्रसिध्द तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना राज्यात मोठा मान आहे. त्यांच्या तीन पिढ्या महाराष्ट्राचे लोकरंजन करीत आहेत. लोककलावंत असलेले खेडकर यांनी राजकीय वाट धुंडाळली आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खेडकर हे तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर व तुकाराम खेडकर यांचे सुपूत्र आहेत. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. त्यांच्यासह अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेतील कार्यकर्ते कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात प्रवेश केला आहे.Mangala Bansode, Raghuveer Khedkar join NCP

तमाशा कलावंतांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची सांस्कृतिक संघटना बळकट झाली आहे. मात्र, खेडकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने अनेक जण अचंबित झाले आहेत. खेडकर हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय मानले जातात. मग त्यांनी राष्ट्रवादीत का प्रवेश केला, या लोकांच्या प्रश्नावर खेडकर यांनी भूमिका व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी का जवळचा वाटला...

ते म्हणतात, मी थोरात यांची पाठ सोडणार, असा या प्रवेशाचा अर्थ होत नाही. ते माझे आदर्श आहेत. भविष्यात भारतीय जनता पक्ष, आरपीआय, शिवसेना, काँग्रेस या कुठल्याही राजकीय पक्षांचे आम्ही विरोधक होणार नाही. आम्हा कलावंतांना सर्व पक्ष सारखेच आहेत. आमचे काम करणारा पक्ष आम्हाला जरा जवळचा वाटला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या. तमाशा कलावंतांच्या मानधनात वाढ केली. पॅकेजची मागणी मंजूर केली. त्यामुळे आम्ही सर्वजण राष्ट्रवादीत जात आहोत.

खेडकर यांना राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून तमाशा कलावंतांचे प्रश्न सोडवायचे आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या कार्यालयात अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या कार्याध्यक्ष मंगला बनसोडे आणि अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा लवकरच जाहीररीत्या प्रवेश होणार असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली. Mangala Bansode, Raghuveer Khedkar join NCP

या वेळी पुणे जिल्हाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे, वृद्ध कलावंत मानधन समिती अध्यक्ष शशीकांत कोठावळे, राज्य समन्वयक संतोष साखरे, प्रदेश सरचिटणीस मंगेश मोरे उपस्थित होते.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Ramdas Athawale: महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही; मराठीच्या मुद्द्यावरून रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना ठणकावलं

SCROLL FOR NEXT