Nashik Crime News SaamTv
महाराष्ट्र

Crime News : वडिलांचा शोध घेण्यासाठी निघाला होता तरुण; अचानक टोळकं आलं अन्.., नाशिकच्या शिंगाडा परिसरातील धक्कादायक घटना

Nashik Crime News : संपूर्ण मारहाणीची घटना परिसरात असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

Nashik News : नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरात दुचाकीहुन आलेल्या ६-७ जणांच्या टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण मारहाणीची घटना परिसरात असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे. (Latest Marathi News)

या घटनेबाबत भद्रकाली पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन जाधव हा तरुण त्याचे वडील कामाहून परतले नसल्याने वडिलांचा शोध घेण्यासाठी तो आणि त्याचा मित्र ऋषभ शिंगाडा तलाव परिसरात आला होता.

यावेळी शिंगाडा तलाव परिसरात चेतन आणि त्याचा मित्र हे उभे असताना दुचाकीवरून ६-७ जण आले. या टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून चेतन जाधव याच्या मानेवर धार धार शस्त्राने वार करून त्याला खाली पाडत लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचं समोर आले. (Nashik Crime News)

एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने त्याला जीवे ठार मारल्याची धमकी देखील दिली. या मारहाणीची संपूर्ण घटना परिसरात असलेल्या CCTV कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेत चेतन हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहे.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित नितीन चिळवंटे, गुरु,येशू, अनिल उर्फ येडा, अनिलचा भाऊ पांड्या आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dal Vada Recipe: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत डाळ वडा; सोपी रेसिपी वाचा

Maharashtra Elections Result Live Update: ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर विजयी

Nikki Tamboli Video : बिग बॉस फेम निक्की तांबोळीच्या डोळ्याला दुखापत; हॉस्पिटलबाहेर बॉयफ्रेंडसोबत दिसली, नेमकं झालं काय?

Cotton One Piece: फिरायला किंवा ऑफिससाठी कॅज्यूल लूकसाठी 'हे' वनपिस ड्रेस नक्की ट्राय करा

मुंबईत ठाकरेंचा पराभव होताच नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; नितेश राणे म्हणाले, आता पाकिस्तानात जा!

SCROLL FOR NEXT