गतिमंद बालिकेवर बलात्कार; नराधमास 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा! संजय जाधव
महाराष्ट्र

गतिमंद बालिकेवर बलात्कार; नराधमास 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा!

12 वर्षीय गतिमंद बालिकेवर लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या 32 वर्षीय सुरेश सुरवाडे या नराधमास खामगावच्या विशेष न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

संजय जाधव

बुलढाणा : 12 वर्षीय गतिमंद बालिकेवर लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार Sexual Assault करणाऱ्या 32 वर्षीय सुरेश सुरवाडे या नराधमास खामगावच्या विशेष न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच सोबत 50 हजारांचा दंड व दंड न भरल्यास आणखी दोन वर्षे कारावास भोगावा लागणार आहे. विशेष न्यायाधीश प्रज्ञा काळे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणात 8 साक्षीदार तपासण्यात आले होते. खामगाव ग्रामीण पोलिसांनी Khamgaon Police या प्रकरणाचा अत्यंत कर्तव्यदक्षपणे तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. ही घटना खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे 22 जानेवारी 2020 रोजी घडली होती. पीडितेच्या नातेवाइकांनी 23 जानेवारी 2020 रोजी तक्रार दिली होती.

पीडितेची साक्ष शिक्षिका सरिता पाटील यांच्या मदतीने नोंदविण्यात आली होती. डॉ. मनिषा पांडे, पोलीस उपनिरिक्षक रोशनी अहिरे आणि पीडितेच्या आजीसह काकूची साक्ष महत्त्वाची ठरली. केवळ शारीरिक, मानसिकच नव्हे तर तिच्या असाह्यतेचा फायदा आरोपीने घेत शोषण केल्याचे अतिरिक्त शासकीय अधिवक्ता रजनी बावस्कर (भालेराव) यांनी न्यायालयाला सांगितले. गुन्हा सिद्ध झाल्याने विशेष न्यायाधीश प्रज्ञा काळे यांनी सुरवाडे याला शिक्षा सुनावली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT