Solapur Wedding Saam TV
महाराष्ट्र

Solapur : एक नवरा, दोन बायका! जुळ्या बहिणींशी लग्न करणं पतीला महागात पडणार का? पोलीस म्हणाले...

या प्रकरणावर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी महत्वपूण माहिती दिली आहे.

विश्वभूषण लिमये

Marriage With Two Sisters : अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने जुळ्या बहिणींसोबत लग्न केले होते. राज्यभर या लग्नाची चर्चा सुरू होती. अतुल अवताडे असे संबंधित नवरदेवाचे नाव होते. तर रिंकी आणि पिंकी अशा त्या जुळ्या बहिणी होत्या. याबाबत महिला आयोगाने याची दखल घेत सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना पत्र पाठविले होते. या प्रकरणावर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी महत्वपूण माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

अकलूज पोलीस ठाण्यात याबाबत एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार कोर्टात तपास करण्याची परवानगी मागितली. कोर्टाने अदखलपात्र गुन्ह्यात तपास करता येत नाही, असे सांगितले.

तसेच पीडित महिलांनी तक्रार दाखल केल्यास किंवा त्याचे अगोदर लग्न झाले असेल. तसेच पहिल्या पत्नीने तक्रार दाखल केल्यास सोलापूर पोलीस (Police) तपास करतील, अशी माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

पहिले लग्न झालं असेल तर पहिल्या पत्नीने तक्रार द्यावी आम्ही तपास करू शकतो. जुळ्या बहिणींशी एकाच वेळी लग्न करणाऱ्या अतुल अवताडे याने पहिले लग्न केले असेल, तर पहिल्या पीडित पत्नीने संबंधित पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी. गुन्हा दाखल करून आम्ही कोर्टाचा आदेशानुसार पुढील तपास करू, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.

या प्रकरणात पीडितांनीच येऊन तक्रार दाखल करावी. या लग्नापासून ज्यांचं नुकसान झालं आहे. त्यांनीच तक्रार द्यावी, असेही पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी माहिती देताना सांगितले की,यापूर्वी अकलूज येथील एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. कोर्टात यावर सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने पीडित कोण आहे ? असे विचारले.

कारण तक्रार करणारा हा पीडित नव्हता. जुळ्या बहिणींपैकी कोणी असेल किंवा संबंधित लग्न करणाऱ्याचे पाहिले लग्न झाले असेल आणि पहिल्या बायकोने तक्रार दिली असेल, तरतपास करा असा आदेश कोर्टानं दिला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई किंवा तपास केला जातो अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT