chhatrapati sambhaji nagar shocking Saam tv
महाराष्ट्र

Shocking : बजरंग दलाच्या अध्यक्षाकडून 17 वर्षीय तरुणाची हत्या; छत्रपती संभाजीनगरात खळबळ, काय आहे संपूर्ण प्रकरण?

chhatrapati sambhaji nagar shocking : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात दिवाळीच्या बॅनरवरून वाद टोकाला गेला. त्यानंतर झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला.

डॉ. माधव सावरगावे

दिवाळीच्या बॅनरवरून झालेल्या वादातून बिडकीन गावात एका तरुणाचा मृत्यू

पोलिसांकडून आरोपी बजरंग दलाचा अध्यक्ष चिमन जाधवला अटक

या प्रकरणात पोलिसांकडून पाच जणांना अटक

मृत तन्मय चोरमारे याचा उपचारादरम्यान मृत्यू

दिवाळीच्या बॅनरवरून वाद टोकाला गेल्यानंतर झालेल्या हाणामारीच्या घटनेत एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन गावात संपूर्ण प्रकर घडला. या प्रकरणी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या बजरंग दलाच्या अध्यक्षाला अटक केली आहे. चिमन जाधव असे हत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बिडकीन बाजारात दिवाळीच्या बॅनरवरून दोन गटात वाद झाला. तन्मय चोरमारे आणि चिमन जाधवच्या गटात झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. बिडकीनचे सरपंच अशोक धर्मे यांचा भाचा चिमन जाधव आणि त्याच्या गटाने केलेल्या मारहाणीत तन्मय चोरमारे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्मय चोरमारेला लोखंडी पाईप, गज, लाकडी दांडे, लाथा-बुक्यांनी मारहाण केली. या जबर मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तन्मय चोरमारेचला गावातील एका रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगितलं. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तन्मयचा शुक्रवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणी ऋषीकेश उर्फ चिमन जाधव असे हत्या करणाऱ्या बजरंग दलाच्या अध्यक्षाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या विरोधात बिडकीन पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांत चिमन जाधवसह 30 ते 35 अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. तसेच या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक केली आहे. राहुल तांगे, नयन तांगे, सागर तांगे, चिमन जाधव आणि प्रदीप तांगे असे आरोपींची नावे आहेत.

भयंकर घटना नेमकी कुठे घडली?

तरुणाच्या हत्येची ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन गावात घडली .

दोन गटाच्या वादाचे कारण काय होते?

दिवाळीच्या बॅनरवरून दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत बदलले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

Election Commission: राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय; याद्यांतील घोळ,मतचोरीविरोधात उचलणार कठोर पाऊल

लाखांचं सोनं 100 रुपयांवर येणार? सोन्याची किंमत का घसरणार?

SCROLL FOR NEXT