Man- Khatav Assembly Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Man- Khatav Assembly Election: माण- खटावमध्ये पुन्हा 'जय हो'? प्रभाकर देशमुख धक्का देणार की शेखर गोरे 'करेक्ट कार्यक्रम' करणार? असं असेल राजकारण!

Man- Khatav Assembly Election 2024: माण खटाव विधानसभा मतदार संघात गेल्या पंचवार्षिकप्रमाणे पुन्हा एकदा तिरंगी लढत होणार हे फिक्स आहे. विद्यमान आमदार जयकुमार गोरे चौथ्यांदा आमदार होण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत.

Gangappa Pujari

लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात विधानसभेचे चित्र काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारा मतदार संघ म्हणजे माण- खटाव. माण खटावमध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार जयकुमार चौकार मारणार, गेल्या निवडणुकीत निसटता पराभव झालेले प्रभाकर देशमुख धक्का देणार की आमदारांचे बंधु शेखर गोरे करेक्ट कार्यक्रम करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काय असेल माण-खटावचं राजकीय गणित? वाचा सविस्तर...

तिरंगी लढत फिक्स!

माण खटाव विधानसभा मतदार संघात गेल्या पंचवार्षिकप्रमाणे पुन्हा एकदा तिरंगी लढत होणार हे फिक्स आहे. विद्यमान आमदार जयकुमार गोरे चौथ्यांदा आमदार होण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत. तर त्यांच्यासमोर सख्खा भाऊ म्हणजेच शेखर गोरे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी विभागीय पोलीस आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे आव्हान असेल.

मविआत ठिणगी पडणार?

तत्पुर्वी, आमदार गोरेंचे बंधु शेखर गोरे हे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत तर प्रभाकर देशमुख हे शरद पवारांचे विश्वासू आहेत. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी अन् ठाकरे गटामध्ये तिकीटावरुन वाद रंगण्याची शक्यता आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभय जगताप हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ऐनवेळी ते बंडखोरी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

२०१४, २०१९ ला स्थिती काय?

याआधी २०१४ मध्ये जयकुमार गोरे यांनी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत रासपच्या तिकीटावर उभे राहिलेले बंधु शेखर गोरे यांनी कडवी झुंज दिली मात्र जयकुमार गोरेंनी बाजी मारली. २०१९च्या निवडणुकीआधी जयकुमार गोरे हे भाजपच्या गोटात गेले अन् विधानसभेला उभे राहिले. या निवडणुकीत त्यांच्यासमोर शेखर गोरे आणि प्रभाकर देशमुख यांचे आव्हान होते.

गोरेंची हॅट्रिक पण साहेबांनी घाम फोडला!

गेल्या पंचवार्षिकला पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रभाकर देशमुख यांनी आमदार गोरेंना घाम फोडला होता. या निवडणुकीत आमदार गोरेंचा अवघ्या २ हजार २५५ मतांनी विजय झाला. या निवडणुकीत गोरे यांना 91469 प्रभाकर देशमुख यांना 88 हजार 426 मतं तर शेखर गोरे यांना 37 हजार 539 मतं मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत निसटत्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रभाकर देशमुख सज्ज असतील तर बंधु शेखर गोरे यांनी सुद्धा जयकुमारचा करेट कार्यक्रम करणार असल्याचे म्हणत दंड थोपटले आहेत. त्यामुळे नेमकं कोण कुणाचा गेम करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोणाचे पारडे जड?

सध्या सत्तेत असल्याने आमदार जयकुमार गोरे यांच्यामागे मोठी ताकद आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास, मावळते खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे जिवलग मित्र त्याचबरोबर जलनायक अशी तयार झालेली ओळख ही त्यांच्या जमेची बाजू आहे. मात्र कोरोना काळात भ्रष्टाचाराचे आरोप, खासदार उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीविरोधात केलेली दिल्ली वारीच्या चर्चा आणि प्रभाकर देशमुख यांचे कडवे आव्हान यामुळे आमदार गोरेंसाठी ही निवडणूक नक्कीच सोपी नसेल.

अलिकडच्या काळात प्रभाकर देशमुख यांनी दोन्ही तालुक्यांमध्ये दांडगा जनसंपर्क ठेवला आहे. अनेक कार्यक्रम, उपक्रम तसेच विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी विधानसभेची मोट बांधली आहे. तसेच शरद पवारांचे पाठबळ, सुशिक्षित उमेदवार म्हणून तरुणाईची मिळणारी पसंती ही प्रभाकर देशमुख यांची जमेची बाजू आहे. दुसरीकडे शेखर गोरेंचीही कार्यसम्राट नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळे तीन तगड्या उमेदवारांमध्ये होणारी ही लढत रंगतदार होणार असून शेवटी कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT