Kopargoan , crime news, nagar , police, arrest saam tv
महाराष्ट्र

Nagar : रात्रभर तिच्या मृतदेहाजवळ झाेपला; पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पाेलिसांनी त्याला पकडलं

खान याने यापूर्वीही असे काही कृत्य केले आहेत का ? याचा तपास पोलीस करत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Nagar : भंगार गोळा करण्याच्या वादातून एका परप्रांतीयाने भिक्षेकरी महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना कोपरगावमध्ये (nagar) घडली आहे. विशेष म्हणजे संशयित रात्री मृतदेहाशेजारी झोपून होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सकाळी रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी (police) मोठ्या शिताफीने जेरबंद (arrest) केलं. (Maharashtra News)

नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर शिवारात भिक्षेकरी महिला मयत सोनुकुमारी आणि मूळचा बिहार येथील असणारा संशयित आरोपी निसार खान यांचे भंगार आणि प्लास्टिक बाटल्या गोळा करण्यावरून वाद झाले होते. त्याचाच राग मनात धरून निसार खान याने रात्रीच्या सुमारास सोनुकुमारीची दगडाने ठेचून हत्या केली. (Tajya Batmya)

त्यानंतर त्याने मृतदेह एका व्यापारी संकुलातील दुकानासमोर ओढत नेला. ताे बराच वेळ मृतदेहा शेजारी झोपून राहिला. जाग आल्यानंतर तेथून ताे फरार झाला. दरम्यान सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आला असता त्याने मृतदेह पाहिला आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली.

संबंधित संशयित आरोपीचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध सुरू केला. निसार खान रेल्वेने दुसरीकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी काही तासातच मोठ्या शिताफीने त्याला जेरबंद केले.

खान याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पाेलीसांनी दिली. त्याच्यावर कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान याने यापूर्वीही असे काही कृत्य केले आहेत का ? याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती वासुदेव देसले (पोलीस निरीक्षक, कोपरगाव) यांनी साम टीव्हीशी बाेतलाना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT