Mango tree
Mango tree  Saam TV.
महाराष्ट्र

आंब्याचा मोह जिवावर बेतला; झाडावर आंबे तोडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : उन्हाळा म्हटलं तर अनेकांना झाडावर चढून आंबे तोडण्याची खूप इच्छा होते. त्यामुळं अनेक चाकरमानी आंबे खाण्यासाठी त्यांच्या गावी जातात. मात्र, नाशिकमध्ये (Nashik ) झाडावर चढून आंबे तोडणे तरुणाच्या जिवावर बेतलं आहे. झाडावर आंबे तोडण्यासाठी गेलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअरचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू (Death ) झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या इंदिरा नगर येथील राजसारथी सोसायटीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ( Nashik Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगरमध्ये आंब्याचा झाडावर चढताना एका अभियंत्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अनिरुद्ध अनिल धुमाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. अवघ्या तीस वयाच्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हा तरुण आजोबांच्या घरी झाडावरील आंबे तोडण्यासाठी शिडीच्या सहाय्याने झाडावर चढला. त्यावेळी त्याचा हातातील लोखंडी पाईपचा स्पर्श झाडाजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या वीज वाहिनीला झाल्याने त्यास जोरदार धक्का बसला. विजेचा झटका लागताच अनिरुद्धचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, तीस वर्षीय अनिरुद्ध अनिल धुमाळ त्याचा नाशिकच्या इंदिरानगर येथील आजोबाच्या घरी आला होता. त्यावेळी तो आजोबाच्या घराजवळील आंब्याचा झाडावर शिडीच्या सहाय्याने चढला. झाडावरील आंबे पाडण्यासाठी त्याने लोखंडी पाईप घेतला. आंबे पाडत असताना त्याच्या लोखंडी पाईपचा स्पर्श झाडाजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या वीज वाहिनीला झाल्याने त्यास विजेचा जोरदार धक्का बसला. त्यावेळी लागलेल्या विजेच्या धक्क्याने अनिरुद्ध झाडावरून खाली फेकला गेला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, अनिरुद्धचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, सॉफ्टवेअर इंजिनीअरचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी इंदिरा नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : राजेंद्र गावित यांचा भाजप प्रवेश, पालघरमध्ये शिंदे गटाला धक्का

Rupali Chakankar On Rohit Pawar | रोहित पवारांच्या आरोपावर चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया

Akola Crime News: सासू सतत घ्यायची चारित्र्यावर संशय; संतापलेल्या जावयानं कायमचं संपवलं, नेमकं काय घडलं ?

Solapur Lok Sabha Election | सोलापूरमध्ये EVM मशीन बिघडली, मतदारांचा खोळंबा

Kharif Crop Loan : खरीप हंगामासाठी पीक कर्ज; शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा

SCROLL FOR NEXT