महिलां व नागरिकांचा एल्गार
महिलां व नागरिकांचा एल्गार 
महाराष्ट्र

माळझरा येथे आडवी बाटली व गावहितासाठी महिला व नागरिकांचा एल्गार

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

बरडशेवाळा ( जिल्हा नांदेड ) : हदगाव तालुक्यातील माळझरा येथे गावविकासासाठी व तरुण पीढी नशामुक्त व्हावी यासाठी आडवी बाटली झाली पाहिजे यासाठी एकत्र आले आहेत. विशेष करुन महिलांचा मोठा सहभाग असून गावहितासाठी घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचे सांगण्यात येते.

मनाठा पोलिस ठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावर असलेले व दोन्ही माळरानाच्या मध्यभागी वसलेले माळझरा (ता. हदगांव) हे खेडेगाव आहे. येथील लोकसंख्या अडीच हजारांच्या आसपास असून ग्रामपंचायत सदस्य संख्या नऊ आहे. येथील आदीवासी समाज पच्चाहत्तटक्के आहे. या गावाचा आर्थिक लेखाजोखा कोरडवाहु शेती व मजुरीवर आहे. मात्र येथे दोन ते तीन वर्षांपासून काही नवयुवक व जेष्ठ मंडळी दारु व्यवसायाकडे वळले असल्याने गावात दारु पिऊन सर्व सामान्य माणसाला त्रास देणाऱ्यांमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा - तलवारीने वार करून व डोक्यात दगड घालून २ हत्या

यामुळे गावाचे वैभव हरवत चालले आहे. यासाठी गावातील काही व्यक्तीं व महिलांनी अनेकदा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली पण काहीच फरक पडत नसल्याने अखेर गावातुन अधिकारी, कर्मचारी पदावर कार्यरत असलेले भुमिपूत्र तहसीलदार रंगराव मेंडके, तहसीलदार चिंतामण मिराशे, प्राध्यापक गौतम मगरे व कर्मचारी यांनी अख्खा गावाच्या उपस्थितीत रविवारी चार रोजी हनुमान मंदीराच्या आवारात घेतलेल्या सकाळी आँनलाईन बैठकीत दारुबंदीसह गावहिताच्या निर्णयात सहभाग घेत दारुबंदी समीतीसह विविध समित्या स्थापन केल्या. हनुमान मंदिराला साक्षी ठेवून दारु सोडवणा-या व्यक्तिचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर तंटामुक्ती अध्यक्षांनी दारु सोडवण्यासाठी बक्षीस प्रति महिना ठेवले. तर याच ठिकाणी गावातील शिक्षक पंडीतराव नाईक यांनी आपल्या वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवित शालेय परीसरात वृक्षारोपण करीत शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप आपला वाढदिवस साजरा केला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाबराव हाके व बाबुराव देशमुखे यांच्यासह सरपंच पंडित खोकले, पोलिस पाटील वंसतराव हाके, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर मिराशे, ग्रामसेवक अमोल सोनटक्के, बिट हवालदार श्री. गिरी, पत्रकार श्री. डवरे, तुळशीराम मेंडके, कैलास हाके, कानबा डवरे, साहेबराव खोकले, गोविंद खोकले, गोविंद कपाटे, केशव मिराशे, रामभाऊ कपाटे, गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला युवा मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन श्री. बुरकुले यांनी केले तर आभार शिवशंकर हाके यांनी केले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmednagar Lok Sabha Election: अहमदनगर दक्षिणची जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास

Pune News: हडपसरमध्ये कोयता गँगची दहशत, दुकानं-वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघांना अटक

Aditi And Siddharth : लग्नाआधीच प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्यासोबत गेली फिरायला; रोमॅंटिक फोटो केले शेअर

Exit Poll Lok Sabha Election 2024: सुधीर मुनगंटीवार यांना धक्का! एक्झिट पोलने वाढवलं भाजपचं टेन्शन; काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर बाजी मारणार?

Rohit Sharma Strategy: रोहित शर्माच्या डोक्यात नेमकं काय सुरूये? सराव सामन्यात घेतले २ आश्चर्यचकित करणारे निर्णय

SCROLL FOR NEXT