नवाब मलिक व त्यांचे जावई समीर खान  SaamTvnews
महाराष्ट्र

खटला रद्द करण्यासाठी मलिकांचे जावई समीर खान यांची हायकोर्टात धाव!

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी आपल्यावरील ड्रग्जचा खटला रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सूरज सावंत

मुंबई : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी आपल्यावरील ड्रग्जचा खटला रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. समीर खान, राहिला फर्निचरवाला आणि करण सेजनानी यांना नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) च्या कलम 8(c), 20(b)(C), 27A, 27, 28 आणि 29 अन्वये NCB ने गुन्ह्यात अटक केली होती.

हे देखील पहा :

या तिघांनी ऑनलाईन ड्रग्जची विक्री केल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. या गुन्ह्यात खान हा ड्रग्ज खरेदी विक्रीसाठी आर्थिक मदत करत असल्याचा आरोप एनसीबीकडून करण्यात आला आहे. खान यांनी आता ऍडव्होकेट अद्वैत ताम्हणकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्यावरील खटला रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 482 अंतर्गत गुन्हा रद्द करण्यासाठी

खालील कारणे मांडली आहेत :

  • १. समीर खान यांना या प्रकरणात खोटे ठरवण्यात आले होते;

  • २.समीर खानकडून या प्रकरणात कोणतेही ड्रग्ज मिळालेलं नाही

  • ३. वैद्यकिय चाचणीतही १८ नमुन्यांपैकी एका नमुन्यात ड्रग्ज संबधित काही गोष्टी आढळल्या आहेत.

  • ४. NCB ने नोंदवलेल्या गुन्ह्यातही समीर खान हा सह आरोपी आहे. तसेच त्याचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी आर्थिक व्यवहारातून निष्पन्न झाले आहे.

  • ५. तसेच १८ नमुन्यांपैकी वरवर पाहता ११ नमुने गांजाच्या तपासणीत नकारात्मक असल्याचे आढळले

  • ६. समीर खानकडे कथित ७.५ ग्रॅम गांजा व्यतिरिक्त कोणतीही प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे खानवर कटाचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यासह अन्य कारणे दिलेली आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मकरसंक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची तुळशी व पाद्यपुजा बंद राहणार

Bangladesh: बांगलादेशमध्ये हिंदू तरुणाची गोळ्या झाडून हत्या, ४२ दिवसांतील १३ वी घटना

Suruchi Beach Vasai : मुंबई जवळ वसलेला आहे 'हा' शांत समुद्रकिनारा, फॅमिली फ्रेंड्ससोबत वीकेंडला नक्कीच भेट द्या

PM Awas Yojana: घरकूल लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी, सौर संच बसवायला मिळणार 'CSR' फंड; बँकेतूनही घेता येणार कर्ज, वाचा

Fruits For Eye And Skin: कमी होईल चष्म्याचा नंबर आणि चेहऱ्यावर येईल ग्लो; दररोज 'या' 3 फळांचे करा सेवन

SCROLL FOR NEXT