Proposed four-laning of Malegaon-Satana road aims to improve safety and connectivity. saam tv
महाराष्ट्र

मालेगाव-सटाणा शहराचा होणार कायपालट; रस्ता चौपदरीकरणाने अपघाताचा धोका टळेल, रोजगार अन् पर्यटन वाढेल

Malegaon-Satana Road: अपघात कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी सुलभ करण्यासाठी या रस्त्याचे काँक्रीटीकरण व चौपदरीकरण होणे आवश्यक आहे. दादा भुसे यांनी या प्रोजेक्टचा पाठपुरावा सुरू केला आहे.

Bharat Jadhav

मालेगाव-सटाणा रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी वाढली

वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी प्रकल्प महत्त्वाचा

पर्यटन आणि रोजगार वाढण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून मालेगाव-सटाणा दरम्यानचा रस्ता चौपदरीकरण करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी पाठपुरावा करत आहेत. मालेगाव-सटाणामधील राज्यमार्ग क्रमांक १९ वरील वाहतूक प्रचंड वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. तसेच अपघाताच्या घटना वारंवार घडत असतात.

गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पण रस्त्याच्या अरुंद स्वरूपामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या कायम निर्माण होत असते, त्यामुळे या मार्गाचा विस्तार झाला पाहिजे अशी मागणी केली जातेय. मंत्री दादाजी भुसे यांनी पुन्हा या मागणीचा पाठपुरावा सुरू केला आहे. मालेगाव ते सटाणामधील सुमारे ३९ किलोमीटर अंतराच्या या रस्त्याचे काँक्रीटीकरणासह चौपदरीकरण तातडीने मंजूर करण्यात यावे, असा आग्रह त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धरला आहे. या रस्त्याच्या कामासाठी आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून निधी उपलब्ध करून घेण्याबाबतही भुसेंनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.

​मालेगाव-सटाणा हा रस्ता स्थानिक दळणवळणासह आंतरराज्य वाहतुकीसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. उत्तर महाराष्ट्रातील व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा आहे. हा मार्ग मालेगावमार्गे पुणे, इंदूर, छत्रपती संभाजीनगर आणि सटाणामार्गे सुरत (गुजरात) सारख्या मोठ्या शहरांना जोडणारा एक प्रमुख दुवा आहे. कृषी माल कांदा आणि डाळिंबाच्या आंतरराज्य वाहतुकीसाठी या रस्त्याचा सर्वाधिक वापर होत असतो.

​या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे वारंवार घडणाऱ्या अपघातांचा धोका टळण्यास मदत होणार आहे. वाहतूक कोंडी सुटल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल पर्यायी इंधनाचीही बचत होईल. हा मार्ग थेट गुजरात राज्याशी जोडला जात असल्याने व्यापारी उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे.

रस्ता विकास झाल्याने परिसरातील उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहिती भुसे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamil Nadu Election: रिक्षावाला बनला आमदार ! दोन दिग्गज नेत्यांना चारली धूळ

Election Result Live: बंगालला भयमुक्त करणार ही मोदींची गॅरंटी: पीएम

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सोबत हवाई प्रवास; विमानाच्या हवेत तीन घिरट्या नंतर... अचानक काय घडलं?

Dombivli : डोंबिवलीत पाणी संकट! 'या' भागात २ दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा सविस्तर

Mumbai Tourism : गेटवे, मरीन ड्राईव्ह नाही; Summer Vacation मध्ये फिरा मुंबईतील 'हे' ५ वन डे पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT