Bad Breath Remedies : तोंडाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? जाणून घ्या तोंडाचा वास घालवण्याचे नैसर्गिक उपाय

Saam Tv

या गोष्टी टाळा

  • साखरयुक्त मिंट आणि कॅन्डीजमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते.

  • रंगीत आणि साखरेचे कोटिंग असलेली बडीशेप दातांसाठी हानिकारक ठरू शकते.

  • अतिप्रमाणात अल्कोहोल असलेले माउथवॉश वापरल्याने तोंड कोरडे पडते आणि दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया अधिक वेगाने वाढतात.

Bad breath | pinterest

साधी बडीशेप

विनासाखरेची साधी बडीशेप चावून खाल्ल्याने लाळ निर्मिती वाढते आणि तोंड नैसर्गिकरीत्या स्वच्छ राहण्यास मदत होते.

Plain Fennel Seeds | PINTEREST

वेलची

वेलचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तोंडातील दुर्गंधी निर्माण करणाऱ्या जंतूंचा नाश करतात.

Cardamom | pinterest

लवंग

लवंगमुळे तोंडाला ताजेतवाने वाटतेच, शिवाय त्यातील गुणधर्मांमुळे हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि वेदना/संसर्गापासून आराम मिळतो.

Clove | pinterest

पुदिन्याची पाने

पुदिन्याची ताजी पाने चावल्याने तोंडात त्वरित ताजेपणा येतो आणि दुर्गंधी दूर होते.

Fresh Mint Leaves | pinterest

भरपूर पाणी पिणे

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास तोंड कोरडे पडते. त्यामुळे दिवसभरात पुरेसे पाणी पिणे हा तोंडाची दुर्गंधी घालवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.

drink water | pinterest

महत्त्वाचा सल्ला

जर रोज योग्य स्वच्छता ठेवूनही तोंडाची दुर्गंधी जात नसेल, तर ते दातांची किड, हिरड्यांचे आजार किंवा पचनाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते.

Bad breath | pinterest

टीप

घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डेंटिस्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Bad breath | pinterest

NEXT : आर्टिफिशियल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चमक टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स, जाणून घ्या

How to clean artificial jewelry | SAAM TV
येथे क्लिक करा