Saam Tv
परफ्यूम, डिओडोरंट, हेअर स्प्रे, मॉइश्चरायझर आणि लोशन यामध्ये विविध केमिकल्स असतात, ज्यामुळे ज्वेलरीची चमक खराब होऊ शकते.
अंघोळ करताना, हात धुताना, स्विमिंग करताना किंवा घाम येणाऱ्या कामांच्या वेळी आर्टिफिशियल ज्वेलरी आवर्जून काढून ठेवा.
नवीन ज्वेलरी आणल्यावर तिच्या मागच्या बाजूला पारदर्शक नेलपॉलिशचा एक पातळ थर लावू शकता. यामुळे त्वचेचा घाम आणि ओलावा थेट धातूवर परिणाम करत नाही आणि ज्वेलरी काळी पडण्यापासून वाचते.
दिवसभर ज्वेलरी वापरल्यानंतर ती काढून ठेवण्यापूर्वी एका मऊ, सुती किंवा मायक्रोफायबर कापड्याने हलक्या हाताने पुसून घ्या.
सर्व दागिने एकत्र एकाच डब्ब्यात ठेऊन देऊ नका, कारण यामुळे ते एकमेकांना घासून त्यांची पॉलिश निघू शकते.
प्रत्येक दागिना वेगळ्या झिप-लॉक बॅगमध्ये किंवा मऊ पाउचमध्ये ठेवा.
ज्वेलरी बॉक्समध्ये ओलावा येऊ नये म्हणून सिलिका जेलचे छोटे पॅकेट्स ठेवू शकता.
ज्वेलरी नेहमी कोरड्या आणि थंड जागी ठेवा, चुकूनही बाथ रूममध्ये किंवा उन्हात ठेवू नका.
NEXT : डायबिटिजचा धोका कमी करतात 'हे' पदार्थ, शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा