Diabetes Control Food: डायबिटिजचा धोका कमी करतात 'हे' पदार्थ, शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Shruti Vilas Kadam

ओट्स

ओट्समध्ये फायबर असते, जे पचन प्रक्रिया मंद करते. यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर जास्त वाढत नाही. साखर न घालता ओट्स खाणे अधिक फायदेशीर ठरते.

ओट्स | yandex

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळे संतुलित पोषण मिळते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

हिरव्या पालेभाज्या | saam tv

डाळी आणि कडधान्ये

मूग, मसूर, हरभरा आणि राजमामध्ये प्रोटिन व फायबर असतात. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. नियमित आहारात योग्य प्रमाणात डाळी आणि कडधान्ये घेतल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Diabetes Healthy Food

सुका मेवा आणि बिया

बदाम, अक्रोड, जवस आणि चिया सिड्समध्ये फायबर आणि हेल्दी फॅट असतात. हे पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

सुका मेवा आणि बिया

धान्ये

ज्वारी, बाजरी, नाचणी आणि संपूर्ण गव्हापासून बनवलेले पदार्थ आहारात समाविष्ट करता येतात. मात्र, केवळ धान्य बदलणे पुरेसे नसून एकूण कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे.

Nachani | pinterest

कमी साखर असलेली फळे

पेरू, सफरचंद, संत्रे आणि इतर फळांमधून फायबर व जीवनसत्त्वे मिळतात. फळांचा रस पिण्याऐवजी संपूर्ण फळ खाणे अधिक चांगले. मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तींनी एक तरी फळं खावे.

Orange | yandex

दही, दूध, पनीर

साखर न घातलेले दही, दूध, पनीर आणि इतर योग्य प्रोटिन असलेले पदार्थ संतुलित आहारासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे साखर न घालता दहीचा आहारात नक्की समावेश करावा.

Dahi

Surya Namaskar: १०,००० पावले, सायकलिंग किंवा जिम विसरा; 'हा' व्यायाम आहे लय भारी

Surya Namaskar | SaamTv
येथे क्लिक करा