malegaon rada  Saam tv
महाराष्ट्र

मालेगाव महापालिकेत पुन्हा राडा; इस्लाम आणि MIM च्या नगरसेवकांची एकमेकांना धक्काबुक्की

malegaon rada : मालेगाव महापालिकेत पुन्हा राडा झाला. इस्लाम आणि MIM च्या नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.

Vishal Gangurde

मालेगाव महापालिकेत राडा

इस्लाम पक्ष आणि MIM नगरसेवकांमध्ये बाचाबाची

धक्काबुकीच्या घटनेने सभागृहात तणावाचे वातावरण

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिकमधील मालेगाव महापालिकेत महासभेत पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे. दोन पक्षाचे नगरसेवक आमनेसामने आले आहेत. इस्लाम पक्ष आणि MIM नगरसेवकांमध्ये तीव्र बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. नगरसेवकांच्या धक्काबुक्कीमुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झालं.

मालेगाव महापालिकेच्या महासभेत SIR मुद्द्यावरून मोठा गोंधळ निर्माण झालाय. SIR मुद्द्यावरून इस्लाम पक्ष आणि MIM नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही गटातील वाद इतका वाढला की, काही नगरसेवक एकमेकांवर धावून गेले. त्यामुळे दोन्ही गटाच्या नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली. या गोंधळामुळे काही काळ पालिकेच्या महासभेचे कामकाज ठप्प झाले.

काही दिवसांपूर्वी नगरसेवकांमध्ये झाला होता राडा

काही दिवसांपूर्वी देखील मालेगाव महापालिकेत गोंधळ पाहायला मिळाला होता. अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी महासभा शाब्दिक चकमकीमुळे तणाव निर्माण झाला. सत्ताधारी इस्लाम पार्टी आणि एमआयएमच्या नगरसेवक एकमेकांच्या विरोधात भिडले होते. घरपट्टीच्या मुद्द्यावरून गोंधळ झाला होता. दोन्ही गटाचे नगरसेवक आक्रमक झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी सभागृहात एमआयएमचे गटनेते अब्दुल मालिक आणि महापौर पती खालिद हाजी यांच्या शा‍ब्दिक चकमक पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. काही काळ सभागृहात घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू होता. त्यानंतर काही वेळासाठी कामकाज ठप्प झालं होतं. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेवकांनी वाद मिटवून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. त्यानंतर महासभेचे कामकाज पुन्हा सुरू झालं.

पालिका सभागृहात वाद कशावरून झाला?

SIR मुद्द्यावरून इस्लाम पक्ष आणि MIM नगरसेवकांमध्ये वाद होऊन धक्काबुक्की झाली.

धक्काबुकीच्या घटनेवर काय परिणाम झाला?

पालिका सभागृहातील गोंधळामुळे काही काळ महासभेचे कामकाज ठप्प झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदूबाबाच्या वेशात चोरी ; रांजणगावातील चोरटा सीसीटीव्हीत कैद

Shocking : नाशिकमध्ये भयंकर घडलं! दाजीनं सालीला पत्नीसमोर संपवलं; धक्कादायक कारण समोर

Deool Band 2 Collection : स्वामींच्या नावानं महाराष्ट्र दुमदुमला; प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'ची दुसऱ्या दिवशी बक्कळ कमाई, आकडा वाचून थक्क व्हाल

अपात्र लाडक्या बहीणींचा लाभ पुन्हा सुरू होणार? E- KYC केंद्रांवर वाढली महिलांची गर्दी

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

SCROLL FOR NEXT