Pune Rain: पुण्यासाठी पुढचे ३ तास महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार

Pune Weather Alert: पुण्यासाठी पुढचे ३ तास महत्वाचे असणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला सोमवारी वादळी वाऱ्यासह आणि गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पावसाने पुणे शहराला अक्षरश: झोडपून काढले. पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारंबळ उडाली. आज देखील पुण्यासाठी महत्वाचा असणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यासह अन्य जिल्ह्यासाठी पुढील ३ तासांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि सातारा येथील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह हलक्या स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळे होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com