Malegaon court summons to Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut News: मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांना मालेगाव कोर्टाचे समन्स; नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut Latest News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना नाशिकच्या मालेगाव कोर्टाने समन्स बजावलं आहे.

Satish Daud

Sanjay Raut Malegaon Court Summons

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना नाशिकच्या मालेगाव कोर्टाने समन्स बजावलं आहे. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्याप्रकरणी कोर्टाने हे समन्स बजावलं आहे. गेल्या १५ दिवसांत कोर्टाने राऊतांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. त्यामुळे संजय राऊत कोर्टात हजर राहतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

शिंदे गटाचे नेते तसेच मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव (Nashik News) येथील गिरणा साखर कारखान्यात अपहार केला आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

यानंतर मंत्री दादा भुसे यांनी तातडीने पत्रकारपरिषद घेत राऊतांचा दावा फेटाळून लावला होता. इतकंच नाही, तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मालेगाव येथील कंपनीच्या सर्वसाधारण सभेत येऊन अपहार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी उपस्थित राहावे, असे जाहीर आमंत्रण दिले होते.

मात्र, संजय राऊत या बैठकीला हजर राहिले नाही. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचं म्हणत दादा भुसे यांनी कोर्टात धाव घेतली. दरम्यान, दादा भुसे यांच्या मानहानीच्या तक्रारीवरून मालेगाव कोर्टाने खासदार संजय राऊत यांना समन्स बजावलं आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील कोर्टाने ७ ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते सुनावणीला हजर राहिले नव्हते. आता कोर्टाने त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावल्याने राऊत सुनावणीला हजर राहणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh Chess World Cup : दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! नागपूरच्या १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास

Brain Exercises: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा 'या' ब्रेन ॲक्टिव्हिटिज

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

SCROLL FOR NEXT